शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

निफाड नगर पंचायतीस उत्तेजनार्थ पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 00:14 IST

निफाड : माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत नगर पंचायत गटात निफाड नगर पंचायतीस उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

ठळक मुद्देनिफाड नगर पंचायतीच्या वतीने मोठ्या स्वरूपात वृक्षारोपण

निफाड : माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत नगर पंचायत गटात निफाड नगर पंचायतीस उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

निफाड नगर पंचायतीच्या वतीने मोठ्या स्वरूपात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात आली होती. या खताचा वापर वृक्षारोपणासाठी करण्यात आला. त्याचप्रमाणे ओला व सुका कचरा साठवण्यासाठी नागरिकांना डस्टबीनचे वाटप करण्यात आले होते. त्याचप्रमाणे नागरिकांसाठी रांगोळी, पोस्टर, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दर बुधवारी सायकल रॅलीचे शहरात आयोजन करण्यात येत होते.

विना इंधन वाहनांच्या जनजागृतीसाठी इलेक्ट्रिकल व्हेइकल कॅम्प घेण्यात आला होता. शहरात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले होते, त्याचप्रमाणे पर्यावरण व स्वच्छतेच्या दृष्टीने इतर विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याची दखल घेत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे, नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके, नगर अभियंता भालचंद्र क्षीरसागर, कार्यालयीन अधीक्षक हर्षवर्धन मोहिते, लेखापाल नितीन भवर, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता भाग्यश्री सोनवणे व नगर पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.निफाड नगर पंचायतीला हे पारितोषिक मिळाले याचा मनस्वी आनंद वाटला. या स्पर्धेचे उपक्रम यशस्वी करण्यासाठी निफाड नगर पंचायतीचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. कोरोनाच्या ५ महिन्यांच्या कठीण काळात आम्ही पर्यावरण, स्वच्छता याबाबत जे उपक्रम राबवले यात नागरिकांचे मोठे सहकार्य मिळाले. २०२१- २२ यावर्षीच्या या स्पर्धेसाठी आम्ही अधिक चांगले यश मिळवण्याचा प्रयत्न करू.- डॉ. श्रीया देवचके, मुख्याधिकारी, नगर पंचायत, निफाड. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार