नाशिक : येथील निफाड तालुक्यातील तारुखेडले शिवारात ऊसाच्या शेतालगत असलेल्या घराबाहेर खेळणाऱ्या बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.३) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात बालिकेचा जागीच मृत्यू झाला.याबाबत मिळालेली माहिती अशी, तारुखेडले शिवारात शरद जगताप यांच्या मळ्यावर राखणदार म्हणून असलेले अशोक किसन हांडगे यांची पाच वर्षांची मुलगी घराजवळ खेळत होती. यावेळी अचानकपणे ऊसाच्या शेतामधून बिबट्याने येऊन बालिकेला धरून फरफटत शेतात नेले. सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर तत्काळ तिच्या आई-वडिलांनी आरडाओरड करुन आजुबाजुच्या रहिवाशांना सावध केले. त्यानंतर गावकरी हातात लाठ्या-काठ्या, बॅटरी, टेंभे घेऊन शेताच्या दिशेने गेले. सुमारे तासभर शेत पिंजून काढल्यानंतर मयत अवस्थेत गुड्डी हांडगे या पाच वर्षीय बालिकेचा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. गावकऱ्यांनी जखमी अवस्थेत गुड्डीला शेताबाहेर काढले; मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.
निफाडला बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार
By admin | Updated: April 3, 2017 21:17 IST