शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

निफाड परिसराला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:19 IST

शहर परिसरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोपडून काढले. सर्वत्र पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

निफाड : शहर परिसरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोपडून काढले. सर्वत्र पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम असून, पूर्व भागातील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरणातून १४,२३४ क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याने तालुक्यातील नद्या-नाल्यांना पूरस्थिती आली आहे. परतीच्या पावसाने शेतकºयांचे नुकसान केले आहे. या पावसामुळे द्राक्षबागांवर डावण्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने बागायतदार शेतकरी चिंतित झाले आहे.मागील आठवड्यात सूर्यनारायणाने निफाडकरांना भाजून काढले होते. प्रचंड उकाड्याने निफाडकर हैराण झाले होते. रविवारी व सोमवारी संततधार पावसाने निफाड व परिसरात हजेरी लावल्याने दिलासा दिला होता; मात्र मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.मंगळवारी दुपारी १२ वाजेनंतर सुरू झालेला पाऊस दिवसभर सुरू होता. पावसाचा जोर कमी जास्त होत होता. पावसामुळे शहर परिसरातील अनेक सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा दिवसभर जोर असल्याने अनेक शेतात पाणी साचले आहे. ढगाळ वातावरण व सततचा पावसामुळे द्राक्ष व सोयाबीन उत्पादकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या द्राक्षबागा फुलोºयाच्या टप्प्यात असून, ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे द्राक्षमण्याची गळ होत आहे. यामुळे द्राक्षाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. हा पाऊस द्राक्षांना उपयोगी नसल्याने द्राक्षांवर डावणी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फुलोºयातील गळ वाढल्याने शेतकरी महागडी औषधे फवारणी करून बागा वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. या पावसामुळे सोंगणीसाठी आलेल्या सोयाबीनची पाने गळून पडण्यास प्रारंभ झाल्याने सोयाबीन खराब होण्याचा धोका वाढला आहे. सोयाबीनचे दाणे काळसर पडतात की काय अशी चिंंता व्यक्त केली जात आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक चिंतित झाला आहे. दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील पूर्व भागातील गंगापूर, दारणा, कडवा, वालदेवी, पालखेड या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी आणि कादवा, बाणगंगेला पूर आला आहे. तसेच हे पाणी नांदूरमधमेश्वर बंधाºयात येत असल्याने नांदूरमधमेश्वरमधून विसर्ग सुरू आहे. एकूण एकूण ५ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळी ६ वाजता ५ दरवाजे उघडण्यात आले. यातून २५५४८ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आहे.