सटाणा : शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असल्याने हरणबारी मध्यम प्रकल्पासह पठावे, दसाणे लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. नद्यांना पूर आला आहे. मोसम नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने तब्बल नऊ गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुमारे एक हजार हेक्टरहून अधिक अर्ली द्राक्षबागा या संततधारेमुळे संकटात सापडून लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.शहरासह तालुक्यातील हरणबारी मध्यम प्रकल्प, दसाणे, पठावे लघुप्रकल्पच्या पाणलोट क्षेत्रात तसेच मुल्हेर, अंतापूर, ताहाराबाद, सोमपूर, भडाणे, जायखेडा, ब्राह्मणपाडे, आसखेडा, द्याने, मोसम खोरे, काटवन, आरम खोºयातील डांगसौंदाणे, कंधाण,े चौंधाणे तसेच पूर्व बागलाणमधील अजमीर सौंदाणे ,देवळाणे सुराणे वायगाव, वीरगाव, केरसाने परिसरात रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. हरणबारी धरणातून ९२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे मोसम नदीला पूर आला आहे. सोमपूर, जायखेडा, आसखेडा, वाघळे, राजपूरपांडे गावांचा फरशीपूल पाण्याखाली गेल्याने वाघळे, राजपूरपांडे, मेंढीपाडे, वाडीपिसोळ, पिसोळ, नांदिन, तांदूळवाडी, भडाणे, पिंपळकोठे या गावांचा संपर्क तुटला आहे. दसाणे, पठावे लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने कान्हेरी व हत्ती नदीला पूर आला आहे. काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर केळझर मध्यम प्रकल्प ,जाखोड, दोधेश्वर, तळवाडे, बोढरी, बिलपुरी, शेमळी, रातीर ,कºहे येथील लघुप्रकल्प अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत असून केळझर वगळता सर्वच प्रकल्प पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.त्यामुळे आरम, करंजाडी, दोध्याड, सुकेड या नद्या कोरड्याठाक आहेत. मुल्हेर-अंतापूर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम ढासळल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.या संततधार पावसामुळे द्राक्षासह टमाटा, मका, मिरची ,कोबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात एक हजार हेक्टरहून अधिक द्राक्षबागांची अर्ली छाटणी झाली आहे. बागा फुलोºयावर असून, कुज, डावनी, पूलगळ सारखे प्रादुर्भाव निर्माण झाले आहेत. यामुळे उत्पादन खर्चात वाढ होण्याबरोबरच हंगाम हाताशी येईल की नाही या चिंतेने शेतकर्यांना ग्रासले आहे. अन्य पिकांवरही अळीचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसान झाले आहे.
मोसम खोऱ्यातील नऊ गावांचा संपर्कतुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:23 IST
सटाणा : शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असल्याने हरणबारी मध्यम प्रकल्पासह पठावे, दसाणे लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. नद्यांना पूर आला आहे. मोसम नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने तब्बल नऊ गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुमारे एक हजार हेक्टरहून अधिक अर्ली द्राक्षबागा या संततधारेमुळे संकटात सापडून लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.
मोसम खोऱ्यातील नऊ गावांचा संपर्कतुटला
ठळक मुद्देबागलाणमध्ये संततधार : हरणबारी धरणातून विसर्ग; मोसम, हत्ती, कान्हेरी नदीला पूर