हरसूल : नाशिक हरसूल रस्त्यावरील वाघेरा घाटात आज दुपारी हरसूल हून नाशिक येथे प्रवाशी घेऊन जाणारी काळीपिवळी गाडी एम.एच. १५- १५४४ वाघेरा घाटात चालकाचे नियत्रण सुटल्याने २५ फुट खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ९ प्रवासी जखमी झाले आहे.जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. जखमीत कृष्णा रघुनाथ सहारे (२४), कल्पना कृष्णा सहारे (२०) दोघेही राहणार कुलवडी ता़ पेठ, अंबादास लक्ष्मण पवार (३२) रा़ चिंचपाडा, जयवंत पांडुरंग मोहपे (३४) रा. खरशेत, ता़ त्र्यंबक, संगीता तुकाराम भांगरे (२८), तुळसाबाई राजाराम भांगरे, दोघी रा. ध्यानपाडा, कृष्णा रघुनाथ झेधाड (२५) रा. कळमपाडा यांचा समावेश आहे. हरसूल पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास हवालदार मुरलीधर कामडी, रमेश जाधव करत आहे.
प्रवाशी वाहन २५ फूट दरीत कोसळून नऊ जखमी
By admin | Updated: July 11, 2014 00:53 IST