नाशिक : आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जिजाबाई साने यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना तत्काळ सेवेतून निलंबित करावे, या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी गेल्या सात दिवसांपासून आदिवासी आयुक्तालयासमोर आंदोलन सुरू केले आहे़ दरम्यान, आंदोलनाच्या सातव्या दिवशी नऊ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ आदिवासी पँथर संघटनेमार्फत विविध मागण्यांसाठी सुमारे २५० हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांनी सात दिवसांपासून आदिवासी विकास भवनमध्ये आंदोलन सुरू केले आहे़ आंदोलनाच्या सातव्या दिवशी रविवार असल्याने आंदोलकांसोबत कोणत्याही अधिकाऱ्याने चर्चा केली नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी अन्नत्याग सुरू केल्यामुळे नऊ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ त्यातील नितीन सुभाष भुरके (रा. न्हावा, हातगाव, जि. नांदेड) या विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशांत बोडके यांनी दिली़ (प्रतिनिधी)
नऊ आंदोलनकर्ते विद्यार्थी रुग्णालयात
By admin | Updated: November 1, 2015 23:35 IST