द्याने : नामपूर येथे घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, रामचंद्रनगर भागात काल भरदुपारी घरफोडी होऊन अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरून नेल्याने परिसरातील नागरिकांत घबराट पसरली आहे.दरोडा, भुरट्या चोऱ्या यांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, ग्रामरक्षक दल स्थापन करावे, अशी मागणी वाढली आहे. अपुरे संख्याबळ अतिरिक्त कामाचा ताण यामुळे चोरांचे फावते. नामपूरच्या नववसाहतीमध्ये असे प्रकार सर्रास घडत असतात. येथील रामचंद्रनगर परिसरात दत्तात्रेय पर्वत पवार हे महावितरणमध्ये नोकरीला आहेत. रविवार असल्याने पत्नीसह आपल्या शेतात गेले असता त्यांचा भाचा सौरभ धनंजय ठाकरे (१२) हा एकटाच घरात होता. ऐन दुपारच्या वेळेस एक इसम दुचाकीवरून आला. मी मामाचा मित्र असून, बॅँकेचे पासबुक सांगितले. पासबुक शोधत असताना सोन्याचे दागिने घेऊन तो पसार झाला. त्यात नऊ तोळे सोन्याची मंगलपोत, ३५ ग्रॅम व १२ ग्रॅम सोन्याची माळ, सहा ग्रॅमच्या तीन अंगठ्या, सात ग्रॅम कानातील झुबे असा एकूण तीन लाखांचा ऐवज घेत लहान मुलाकडे पिण्याचे पाणी मागितले. दिवसा घडलेल्या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.नामपूर दूरक्षेत्र येथे गुन्ह्यांची नोंद झाली असून, जायखेड्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश पाटील, बी. पी. काळे, दीपक मोरे, अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)