नाशिक : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत जिल्ह्णातील दुष्काळी परिस्थितीमुळे सुरू करण्यात आलेल्या जनावरांच्या चारा छावणीचा आढावा घेऊन चाऱ्याची असलेली उपलब्धता व जनावरांची संख्या पाहता, मालेगाव तालुक्यातील निमगाव येथे जनावरांची चाºयाअभावी हेळसांड होत असल्याने तातडीने याठिकाणी छावण्या सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षपदी उपाध्यक्ष तथा सभापती नयना गावित होत्या.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मंगळवारी पशुसंवर्धन विभागाची नियमित मासिक सभा घेण्यात आली. त्यात पशुसंवर्धन विभागाच्या सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद सेस अंतर्गत मंजूर योजनांच्या नियोजनास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभागातून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला व रिक्त पदांमुळे कामकाजात मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. त्यावर पशुवैद्यकीय अधिकाºयांकडून अहवाल सादर करण्यात येऊन सदरची रिक्त पदे भरणेबाबत किंवा समतोल साधून प्रशासकीय कामे अडणार नाही यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे योग्य मनुष्यबळाची मागणी करण्याबाबत ठराव करण्यात आला. मालेगाव पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांनी मालेगाव तालुक्यातील निमगाव येथील परिसरातील जनावरांचे चाºयाअभावी मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याने त्या ठिकाणी चारा छावण्या मंजूर करण्याबाबतचा ठराव मांडला. त्यास सदस्य संगीता निकम यांनी अनुमोदन दिले.
निमगावी चारा छावण्यांचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 01:06 IST