शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निमा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर

By admin | Updated: July 21, 2016 02:07 IST

निमा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर

 सातपूर : निमा निवडणुकीतील कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवार निश्चितीवरून सत्ताधारी एकता पॅनलच्या उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून एकता पॅनलला आव्हान देण्याचा निर्णय काही उमेदवारांनी घेतला असल्याने निमाच्या बिनविरोध निवडीला खीळ बसली आहे. त्यामुळे निवडणूक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.आयमाप्रमाणेच निमा निवडणुकीत वादविवाद होऊ नयेत आणि निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून अगोदरच कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या कमिटीला उमेदवार ठरविण्याचे आणि बिनविरोध निवडणूक करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले होते. त्यानुसार ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे दिसत होती. या कमिटीने त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले होते. परंतु काल झालेल्या बैठकीवरून त्यांच्या प्रयत्नाना यश मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. उमेदवार निश्चितीवरून मतभेद झाल्याने कोअर कमिटीने अखेर निर्णय उमेदवारांवरच सोपविला आहे. दरम्यान सत्ताधारी एकता पॅनलमध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसत असतांना अन्य काही उमेदवारांनी एकता पॅनलला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. वेळ पडल्यास एकताच्या विरोधात पॅनल तयार करण्याची तयारी करण्यात येत आहे. उमेदवारी माघारीसाठी २२ जुलै शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी उमेदवारांची मनधरणी करण्यास कोअर कमिटीला यश आलेले नाही. काही उमेदवार माघार घेण्यास तयार नसल्याने कोअर कमिटी हतबल झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला काही उमेदवार आव्हान देण्याचा प्रयत्न करीत असल्याने निवडणूक अटळ असल्याचे स्पष्ट होत आहे. (वार्ताहर)