शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजा ठरतोय पक्षांसाठी जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 17:18 IST

सायखेडा : हिवाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात पतंग उडविण्यास सुरवात होत असली तरी नायलॉन मांजा हा आकाशात उडणाºया पक्षांसाठी जीवघेणा ठरत आहे. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात हिवाळ्यात अनेक देशी आणि विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले असल्याने धरण क्षेत्रात विहंग करणाºया पक्षांसाठी नायलॉन मांजा जीवघेणा ठरत आहे.

ठळक मुद्देनांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरातील पक्षी पडताय मृत्यूमुखी

सायखेडा : हिवाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात पतंग उडविण्यास सुरवात होत असली तरी नायलॉन मांजा हा आकाशात उडणाºया पक्षांसाठी जीवघेणा ठरत आहे. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात हिवाळ्यात अनेक देशी आणि विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले असल्याने धरण क्षेत्रात विहंग करणाºया पक्षांसाठी नायलॉन मांजा जीवघेणा ठरत आहे.अशाप्रकारचा मांजा हा धोकादायक असून यावर बंदी आलेली असताना ही त्याचा सर्वत्र सर्रास वापर केला जात असल्याचे दिसत आहे. संक्र ांतिनिमित्त लहानांपासुन थोरांपर्यंत सर्वांनाच पतंग उडविण्याचा मोह होत असतो. परंतु उत्साहाच्या भरात पाहिजे ती सुरक्षेची काळजी न घेतल्याने परिणामी अपघातांना आमंत्रण मिळते.पतंग उडवतांना तुटलेला मांजा बºयाचदा झाडांवर व विजेच्या तारांवर जसल्या तसाच राहिल्याने पक्षांना मोठी दुखापत होते. पक्षांच्या प्रमाणेच हा नायलॉन मांजा मानवीजीवनास देखील अपायकारक असुन आत्तापर्यंत या अशाप्रकारच्या मांजामुळे अनेकांचे गळे, हात पायांना ईजा झाली असून अनेक पक्षी देखील या मांजामुळे मृत्युमुखी पडले आहेत.नायलॉन मांजाचा पक्षांना व मानवाला असणारा धोका लक्षात घेता शासनाने त्याच्या विक्र ीला बंदी घातली असुन राज्य शासनाने ही अधिसूचना पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार जारी केली आहे. पेटा या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या मांजावर बंदीसाठी याचिका देखील दाखल केली होती. पेटा ने सरकारच्या प्राणी कल्याण मंडळाला मांजावर बंदी साठी देखील आवाहन केले होते. तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला देखील यावर बंदी साठी आवाहन केल्याने त्यानंतर राज्यसरकारने आदेश पारित करून नायलॉन मांजावर बंदी टाकली आहे.आकाशात उडत असलेल्या पक्षांवर या मांजामुळे मोठी संक्र ात आली असून पक्षांना हा मांजा दिसून येत नसल्याने त्यांच्या पंखांना गंभीर दुखापत होते. या नायलॉन मांजामुळे अनेक पक्षांचा प्राण देखील गेलेला आहे. दरम्यान नायलॉन मांजा खरेदी व विक्र ी करणाºयावर कलम १८८ अन्वये कारवाई होईल.नायलॉन मांजा निर्मिति व विक्र ी यावर बंदी घालण्यात आली आहे. यांचे उल्लंघन करणाºया व्यक्तीवर भारतीय दंडसंहितेच्या कलम १९६० च्या कायद्याच्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल. अशा नायलॉन मांजाचा वापर टाळावा.अंबादास मोरे,पोलीस निरीक्षक, सायखेडा पोलीस स्टेशन.पतंग उडवीण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केल्याने अनेक पक्षी मृत्युमुखी पडून निसर्गाला धोका पोहोचतो व मानवी जीवण देखील संकटात सापडले आहे. त्यामुळे येणारी संक्र ात हि आपल्या बरोबरच पक्षांना देखील गोड वाटावी यासाठी अशा प्रकारचा मांजा पतंग उडवतांना टाळायला हवा आहे.डॉ. उत्तम डेर्ले,पक्षी प्रेमी, निफाड.सायखेडा व परिसरात नांदूरमध्यमेश्वर हे महत्वाचे पक्षी अभयारण्य असल्याने येथे विविध पक्षी मोठया प्रमाणात आढळतात. पालकांनी आपल्या पाल्याला नायलॉन मांजा न वापरण्याविषयी समजावुन सांगितले पाहिजे व त्याचे दुष्परिणाम आपल्याबरोबरच निसर्गावर देखील होत असून नायलॉन मांजाचा वापर टाळला पाहिजे व वापर करणार्यांवर पोलिसांनी देखील कारवाई केली पाहिजे.गणपत हाडपे,मांजरगाव.