शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

नीलांजन समाभासं रविपुत्रमं यमाग्रजमं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 01:31 IST

‘नीलंजन समाभासं, रविपुत्रमं यमाग्रजमं । छायामार्तंड संभुतं तमनमामी शनैश्चरम्।।’ अशा मंत्राच्या जयघोषात श्री शनैश्चर महाराज जयंती श्हरातील ठिकठिकाणी असलेल्या शनि मंदिरात साजरी करण्यात आली.

नाशिक : ‘नीलंजन समाभासं, रविपुत्रमं यमाग्रजमं । छायामार्तंड संभुतं तमनमामी शनैश्चरम्।।’ अशा मंत्राच्या जयघोषात श्री शनैश्चर महाराज जयंती श्हरातील ठिकठिकाणी असलेल्या शनि मंदिरात साजरी करण्यात आली. यानिमित्त तेलाचा महाभिषेक, होमहवन आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. दरम्यान, पंचवटीत शनि पालखीची शोभायात्रा काढण्यात आली.रामनगर, पेठरोड, पंचवटी येथील श्री शनैश्चर महाराज उत्सव समितीच्या वतीने सोमवारी (दि. ३) सकाळी ८ वाजता शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर भक्तिधामचे मकरंद गणेशशास्त्री गर्गे यांच्या आचार्यत्वाखाली शनिमहापूजेला प्रारंभ झाला. तसेच शनीमूर्तीला तेलाचा महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर गणपती पूजन, पुण्याहवन, मुख्य देवता पूजन, नवग्रह स्थापना पूजन, होमहवन, महापूजा करण्यात येऊन पूर्णाहुतीने उत्सवाची सांगता करण्यात आली.याप्रसंगी संयोजक किशे धात्रे, लक्ष्मण धोत्रे, अनिल कुसाळकर, अनिल कोठुळे, तानाजी धोत्रे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विमल पाटील, कमलेश बोडके, जगदीश पाटील, हेमंत शेट्टी, प्रभाकर पाटील आदि उपस्थित होते.सिडको परिसरात सामूहिक जपजुने सिडको परिसरातील श्री शनैश्चर उत्कर्ष मंडळाच्या शनिजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवती अमावस्या व शनी जयंती निमित्त सकाळी महाभिषेक, होमहवन करण्यात आले. तसेच २३ हजार सामूहिक जप करण्यात आले. याप्रसंगी संतमहंत उपस्थित होते. यावेळी भाविकांना स्फटिक शिवलिंग, श्नीकवच व मारुतीचे छायाचित्र भेट देण्यात आले. दरम्यान शानिमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.देवळालीगावात श्री शनि महाराज जयंती साजरीॐ शनैश्वराय नम: च्या जयघोषात देवळालीगांव श्री शनैश्वर महाराज मंदिरात श्री शनि महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्री शनि महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला रविवारी हभप ज्ञानेश्वर माऊली वाबळे यांच्या किर्तनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सोमवारी पहाटे श्री शनिमहाराजांच्या मूर्तीला तेलाभिषेक करण्यात आला. सकाळी त्र्यंबकबाबा भगत, अण्णा गुरूजी माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, पंचकमिटी अध्यक्ष अ‍ॅड. शांताराम बापू कदम, त्र्यंबकराव गायकवाड आदिंच्या हस्ते मांडव डहाळे व महाआरती करण्यात आली.श्री शनि महाराज यांच्य प्रतिमेची व पालखीतून चांदीच्या मूर्तीची बिटको चौकातून देवळालीगांव पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, केशव पोरजे, सत्यभामा गाडेकर, व्यापारी बॅँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, संचालक सुधाकर जाधव, मनोहर कोरडे आदिंसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान मंदिराच्या प्रांगणात यज्ञपूजा व होमहवनास पाच जोडपे बसले होते. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सत्यनारायण पूजा व महाआरती करण्यात आली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक