शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

नाशकात आजपासून रात्रीची संचारबंदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 01:15 IST

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अखेर नाशिक शहरामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारपासून (दि.२२) रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.  रुग्णांची संख्या हजारपार झाल्यामुळे संचारबंदी लागू होऊ शकते, अशी चर्चा असताना रविवारी पालकमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली.      अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ठळक मुद्देकोरोना संकट : रुग्ण वाढत असल्याने निर्णय

नाशिक : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अखेर नाशिक शहरामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारपासून (दि.२२) रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.  रुग्णांची संख्या हजारपार झाल्यामुळे संचारबंदी लागू होऊ शकते, अशी चर्चा असताना रविवारी पालकमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली.      अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या ६ फेब्रुवारी रोजी रुग्णसंख्या अवघी १११ इतकी होती. दि. ७ फेब्रुवारीनंतर त्यात वाढ होत गेली. मागील पाच दिवसांत तर रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिक असल्याचेदेखील समोर आल्याने काही निर्णय घ्यावे लागले असल्याचे भुजबळ म्हणाले.  रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता नागरिकांमधील बेफिकीरी वाढल्याचा निष्कर्ष समोर आल्याने संचारबंदी लागू करावी लागत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. रात्री ११ वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी नाशिककर जबाबदारीने वागले नाहीत, तर रात्री ८, ९ किंवा १० वाजेपासून संचारबंदी वाढविली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.  कोरोना रोखण्याची जबाबदारी ही नाशिककरांची असून, त्यांनी खबरदारी घेणे अपेक्षित असल्याचेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.    या काळात पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. लग्ण सोहळ्यांना होणारी गर्दी, तसेच बाजारपेठेतील गर्दी पाहता संचारबंदी लागू करण्याची वेळ आली आहे. नाशिककरांनी संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.  

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या