निफाड : तालुक्यातील कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात ४ अंश सेल्सिअस इतक्या सर्वात नीचांकी तपमानाची नोंद झाल्याने संपूर्ण निफाड तालुका कडाक्याच्या थंडीने गारठून गेला होता. यावर्षी या तालुक्यात हे ४ अंश सेल्सिअस इतके सर्वात कमी तपमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावर्षी निफाड तालुक्यात पाऊस चांगला झालेला असून, कडाक्याच्या थंडीने मधून मधून या तालुक्याला गारठून टाकले आहे.
निफाड @ 4
By admin | Updated: January 13, 2017 01:30 IST