शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निकवेलला बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 20:40 IST

निकवेल : बागलाण तालुक्याच्या निकवेल गावातील शिवारात रविवारी (दि.३) रात्री बिबट्याने हल्ला करत गोठ्यात बांधलेले वासरी फक्त केल्याची घटना घडली.

ठळक मुद्दे काही दिवसांपासून निकवेल गाव शिवारात मुक्तसंचार

निकवेल : बागलाण तालुक्याच्या निकवेल गावातील शिवारात रविवारी (दि.३) रात्री बिबट्याने हल्ला करत गोठ्यात बांधलेले वासरी फक्त केल्याची घटना घडली. निकवेल गावातील शिवारात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेतकरी, मजूर व ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परिसरातील दहिंदुले, जोरण व कंधाने शिवारात नेहमी आढळणारा बिबट्या गेल्या काही दिवसांपासून निकवेल गाव शिवारात मुक्तसंचार करतांना दिसत असल्याचे नागरीकांकडून सांगितले जात होते. परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्री निकवेल गावातील रस्त्यावरील शेतीतील गट नं २०७ अशोक सोनावणे यांच्या गोठ्यात बांधलेल्या गायीच्या वासरावर बिबट्याने रात्री हल्ला केला.या हल्ल्यात वासरुठार झाले.सोमवारी सकाळी सोनावणे शेतात गेल्यावर गोठ्यातील वासरु ठार झालेले दिसले. त्या जागी बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले. त्यावेळी सोनावणे यांनी वन कमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे यांच्याशी संर्पक करुन हा सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर वनखात्याचे प्रफुल्ल पाटील यांनी घटना स्थळाची पाहणी करून पंचनामा केला. वासराच्या गळ्याला व पाठीवर बिबट्याच्या दाताने, पंजाचे वार केल्याचे दिसत होते.परिसरात गेल्या काही दिवसांपासून गवत, झाडांचे व ऊस तोड झाल्यामुळे लपन कमी झाले आहे. त्यामुळे बिबट्यासोबत विविध दोन-तीन श्वापदांचे वास्तव्य वाढल्याचे बोलले जात आहे. बिबट्याच्या संचाराने निकवेल गावातील शिवारातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.वनविभागाने या परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वनखात्यातील पाटील याना करण्यात आली. त्यावेळी उपस्थित निकवेल वन कमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे, निलेश वाघ, उपसंरपच मुरलीधर वाघ, महेश वाघ, केवळ सोनवणे, गौरव जाधव, विशाल सोनावणे, मिथुन सोनावणे, राजेंद्र सोनवाने यांच्यासह ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे. (फोटो ०४ निकवेल)