जोरण : बागलाण तालुक्यातील निकवेल येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रामचंद्र मोरे यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच उखूबाई मोरे यांच्यासह तीन सदस्यांनी राजीनामा दिला होता. राजीनाम्याच्या पडताळणीसाठी ग्रामसेवक आर. पी. निकम यांनी विशेष बैठक घेतली. या बैठकीत सरपंच उखूबाई मोरे, सदस्य अण्णा सोनवणे व तसेच इतर सदस्य यांच्या राजीनामा पडताळणीवेळी मोरे यांनी सदर राजीनामा माझा नसल्याचा दावा केल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व कायमस्वरूपी ठेवून सरपंचासह इतर दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले. गुरुवारी निकवेल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणूक कार्यक्र म घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी.पी. अहिरे, एल.ए. धूम यांनी काम पाहिले. यावेळी सरपंचपदासाठी अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने एकमेव मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नवनिर्वाचित सरपंच मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बागलाण पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव, चिंतामण वाघ, साहेबराव मोरे, उपसरपंच दीपक वाघ, इंदूबाई सोनवणे, भिकूबाई सोनवणे, नीलेश वाघ, बाळासाहेब वाघ, सुनील वाघ, संजय वाघ आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
निकवेलच्या सरपंचपदी मोरे यांची निवड
By admin | Updated: August 14, 2016 01:02 IST