शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

निंबाळेत बिबट्या पिंजऱ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:45 IST

चांदवड : तालुक्यातील निंबाळे शिवारात तब्बल पाच तासांनंतर बिबट्यास जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा बिबट्या वनविभागाला गुंगारा देत होता.

ठळक मुद्देवनविभागावर बिबट्या पकडण्याचे आव्हानशाळेत जाणाºया मुलांना या बिबट्याने दर्शन

चांदवड : तालुक्यातील निंबाळे शिवारात तब्बल पाच तासांनंतर बिबट्यास जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा बिबट्या वनविभागाला गुंगारा देत होता. फेब्रुवारी महिन्यात २४ तारखेला वागदर्डी येथील वृद्ध तुकाराम भिवसन सोनवणे (६५) हे गायीला पाणी पाजत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले होते. त्यामुळे परिसरात बिबट्याची भीती होती तर वनविभागावर बिबट्या पकडण्याचे आव्हान असताना शुक्रवारी (दि. ६) सकाळी ६ वाजेच्या सुमारास हरिभाऊ कोंडाजी सोनवणे यांच्या निंबाळे शिवारातील शेतात पाटाचा पूल आहे. या मोरीमध्ये शाळेत सकाळी शाळेत जाणाºया मुलांना या बिबट्याने दर्शन दिले. त्यांनी तातडीने हरिभाऊ सोनवणे व परिसरातील नागरिकांनी ओरडून बिबट्याची माहिती दिली. त्यांनी खात्री करून सदरचा प्रकार वनविभागाचे वनपाल जी.जी. पवार यांच्या कानावर टाकला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वनपाल श्रीमती व्ही. जी. खरात, व्ही.डी. पगारे, सोनाली वाघ, ज्ञानेश्वर पगारे यांनी तातडीने निंबाळे व साळसाणे शिवारात बिबट्या पकडण्यासाठी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पिंजरा मागविला. बिबट्या चिडलेल्या अवस्थेत होता. ग्रामस्थांनी बरीच गर्दी केल्याने आवाज व गोंधळ कमी होत नसल्याने वनअधिकाºयांनी ग्रामस्थांना बाजूला केले. नंतर परिसरात पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यात यश आले. यावेळी निंबाळेचे सरपंच नंदू चौधरी, साळसाणेचे सरपंच अनिल ठाकरे, नामदेव पवार, अशोक शिंदे, अशोक आहिरे, दयानंद कासव, भरत वाघ आदींसह निंबाळे, साळसाणे उपस्थित होते. दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशाने बिबट्याला तानसा येथील अभयारण्यात रवाना केले आहे. वैद्यकिय अधिकाºयांनी बिबट्याची आरोग्य तपासणी केली.पाच तास चालले ‘आॅपरेशन’बिबट्या ज्या मोरीखाली लपला त्याच्या एका दिशेला पिंजरा, तर दुसºया दिशेला मागील बाजूकडून ग्रामस्थांनी फटाके लावले, त्याचवेळी बिबट्या आपोआप पिंजºयात अडकला. हे आॅपरेशन सुमारे चार ते पाच तास चालले अखेर बिबट्या सकाळी ११ वाजेच्या सुमारास पकडण्यात वनविभागाच्या अधिकाºयांना यश आले.