शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्षी दोनच रविवार जाणार वाया ; सलग तीन सुट्यांची पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:41 IST

सन २०१६ मध्ये चार, तर सन २०१७ मध्ये तीन रविवारी सार्वजनिक सुट्यांवर सरकारी कर्मचाºयांना पाणी सोडावे लागले होते. पुढील वर्षी २०१८ मध्ये केवळ दोनच रविवार वाया जाणार असल्याने सरकारी कर्मचाºयांसाठी ही खुशखबर आहे. याशिवाय, वर्षातून तीन वेळा सलग तीन सुट्यांची पर्वणी अनुभवण्यास मिळणार असून, सन २०१८ मध्ये एकूण २२ सार्वजनिक सुट्यांचा लाभ सरकारी कर्मचाºयांसह विद्यार्थीवर्गाला होणार आहे.

नाशिक : सन २०१६ मध्ये चार, तर सन २०१७ मध्ये तीन रविवारी सार्वजनिक सुट्यांवर सरकारी कर्मचाºयांना पाणी सोडावे लागले होते. पुढील वर्षी २०१८ मध्ये केवळ दोनच रविवार वाया जाणार असल्याने सरकारी कर्मचाºयांसाठी ही खुशखबर आहे. याशिवाय, वर्षातून तीन वेळा सलग तीन सुट्यांची पर्वणी अनुभवण्यास मिळणार असून, सन २०१८ मध्ये एकूण २२ सार्वजनिक सुट्यांचा लाभ सरकारी कर्मचाºयांसह विद्यार्थीवर्गाला होणार आहे.  शासनाच्या वतीने सन २०१८ मध्ये होणाºया सार्वजनिक सुट्यांचे वेळापत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे. त्यात प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी- शुक्रवार), महाशिवरात्री (१३ फेबु्रवारी- मंगळवार), छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी- सोमवार), होळी (२ मार्च- शुक्रवार), महावीर जयंती (२९ मार्च- गुरुवार), गुडफ्रायडे (३० मार्च- शुक्रवार), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल- शनिवार), बुद्ध पौर्णिमा (३० एप्रिल- सोमवार), महाराष्टÑ दिन (१ मे- मंगळवार), रमजान ईद (१६ जून- शनिवार), स्वातंत्र्य दिन (१५ आॅगस्ट- बुधवार), पारशी नववर्ष दिन (१७ आॅगस्ट- शुक्रवार), बकरी ईद (२२ आॅगस्ट- बुधवार), गणेश चतुर्थी (१३ सप्टेंबर- गुरुवार), मोहरम (२० सप्टेंबर- गुरुवार), महात्मा गांधी जयंती (२ आॅक्टोबर- मंगळवार), दसरा (१८ आॅक्टोबर- गुरुवार), दिवाळी लक्ष्मीपूजन (७ नोव्हेंबर- बुधवार), दिवाळी बलिप्रतिपदा (८ नोव्हेंबर- गुरुवार), ईद-ए-मिलाद (२१ नोव्हेंबर- बुधवार), गुरुनानक जयंती (२३ नोव्हेंबर- शुक्रवार) आणि ख्रिसमस (२५ डिसेंबर- मंगळवार) अशा एकूण २२ सुट्यांचा समावेश आहे. पुढील वर्षी गुढीपाडवा (१८ मार्च) आणि रामनवमी (२५ मार्च) या दोनच सुट्या रविवारी आल्या आहेत.  सन २०१६ मध्ये चार रविवार, तर चालू वर्षी तीन रविवारी सार्वजनिक सुट्या आल्या होत्या. मात्र, पुढील वर्षी दोनच रविवार वाया जाणार आहेत. डॉ. आंबेडकर जयंती शनिवारी आली असून, याच दिवशी दुसरा शनिवार असल्याने ही सुटीही वाया जाणार आहे. पुढील वर्षी सलग तीन दिवस सुट्यांची पर्वणी तीनदा अनुभवता येणार आहे. २६ जानेवारीला शुक्रवार असून, २७ जानेवारीला चौथा शनिवार आणि २८ जानेवारीला रविवार अशी तीन दिवस सलग सुटी अनुभवता येईल, तर १८ फेबु्रवारीला रविवार, १९ फेबु्रवारीला शिवजयंती आहे तसेच  २९ एप्रिलला रविवार, ३० एप्रिलला बुद्ध पौर्णिमा आणि १ मे रोजी महाराष्टÑ दिन अशी तीन दिवस सुट्यांची मौज आहे.  २३ नोव्हेंबरला शुक्रवारी गुरुनानक जयंतीची सुटी असून, २४ नोव्हेंबरला चौथा शनिवार आणि २५ नोव्हेंबरला रविवारची सुटी असा तीन दिवस सलग सुट्यांचा योग आहे. भाऊबीजेला अतिरिक्त सुटी सन २०१६ मध्ये महाराष्ट दिन, महात्मा गांधी जयंती, दिवाळी लक्ष्मीपूजन आणि ख्रिसमस या चार सुट्या रविवारी आल्या होत्या, तर सन २०१७ मध्ये शिवजयंती, महावीर जयंती आणि मोहरम या तीन सुट्या रविवारी आल्या. त्यामुळे रविवारच्या हक्काच्या सुट्यांवर पाणी फेरले होते. पुढील वर्षी मात्र गुढीपाडवा आणि रामनवमी या दोनच सुट्या रविवारी आल्या आहेत. त्यामुळे केवळ दोनच हक्काचे रविवार जाणार आहेत. पुढील वर्षी ९ नोव्हेंबरला भाऊबीजेला अतिरिक्त सुटी मिळणार आहे.

टॅग्स :New Yearनववर्ष