शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

आरोग्य जागृतीसाठी शिक्षकांनी यावे पुढे

By admin | Updated: June 15, 2014 00:28 IST

अरुण जामकर : आरोग्य विद्यापीठाचा पुढाकार; कृतिशील विद्यार्थ्यांना व्यासपीठ

नाशिक : सर्वसामान्यांमध्ये आरोग्यविषयक जागृती व्हावी यासाठी शिक्षकांनीच पुढाकार घेऊन शालेय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना आरोग्याची माहिती देण्यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी केले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षकांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठास भेट दिली असता, या ठिकाणी त्यांना विद्यापीठाच्या वतीने आरोग्यविषयक जनप्रबोधनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यापीठाच्या डिपार्टमेंट आॅफ हेल्थ कम्युनिकेशन विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजामध्ये आरोग्याविषयाची जागृती कशी निर्माण होऊ शकते, याविषयी जनप्रबोधनाचे काम विद्यापीठाच्या वतीने केले जाते. यासाठी विद्यापीठाअंतर्गत डिपार्टमेंट आॅफ हेल्थ कम्युनिकेशनची स्थापना करण्यात आली असल्याचेही डॉ. जामकर यांनी सांगितले. संशोधनाबाबत विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्याबरोबरच त्यांना अनेक संधी उपलब्ध करून देणे शिक्षकांचे काम आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती शोधून कृतिशील विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ दिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी शिरसाठ, जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे समुपदेशक सुनील अहेर, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील तोरणे, आयुष विभागाचे डॉ. प्रदीप आवळे आणि श्वेता तेलंग यांनी मार्गदर्शन केले. श्रीमता निर्मला अष्टपुत्रे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)