नाशिक : नेवासा तालुक्यातील सोनई दलित हत्त्याकांडातील फोटाग्राफर बोहेकर व पंच बारगजे या दोन साक्षीदारांची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही़ ए़ दौलताबादकर यांच्या न्यायालयात मंगळवारी उलटतपासणी घेण्यात आली़ या खटल्याची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे़ या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड़ उज्ज्वल निकम काम पाहत आहेत़ नेवासा तालुक्यातील गणेशवाडी शिवारातील दरंदले वस्तीवरील पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले यांची मुलगी सीमा ही नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बी.एड.चे शिक्षण घेत होती़ तिचे या संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या व मेहतर समाजातील सचिन सोहनलाल ऊर्फ मोहनलाल ऊर्फ सोमलाल धारू ऊर्फ घारू याच्याशी ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले़ या प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना समजली़
सोनई हत्त्याकांडातील दोन साक्षीदारांची तपासणी पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला
By admin | Updated: November 12, 2014 01:28 IST