शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पेठमध्ये दुसऱ्या दिवशीही संततधार

By admin | Updated: August 4, 2016 00:52 IST

घरांची पडझड : भातशेतीचे नुकसान; पंचनामे करण्याची मागणी

पेठ : शहरासह तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी संततधार सुरूच असून, नद्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर ओसंडून वाहत आहे. वाघेरा घाटातील एकेरी वाहतूक बुधवारी सायंकाळी सुरू करण्यात आली.गत दोन दिवसापासून संपूर्ण तालुक्यात मुसळधारेने हाहाकार उडवला आहे. गावोगावी घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, भिंतींना ओल आल्याने घरसंसार उघड्यावर पडले आहेत. जवळपास सर्व नद्या तुडुंब भरून वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. घाट रस्त्यावर मातीचे भराव खचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.भुवन घाटात दरड कोसळलीभुवनच्या घाटात ठिकठिकाणी दरड कोसळल्याने भुवन, खामशेत, खडकी, आंबापाणी, बोंडारमाळ, उम्रद, बोरपाडा, बिलकस आदि गावांचा पेठशी संपर्क तुटला असून, पेठ, भुवन, हरसूल मार्ग बंद झाला आहे. दमणगंगासह लहान-मोठ्या नद्यांना प्रचंड पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोटंबी घाटातील दरड हटविण्याचे काम मजुरांच्या साह्याने केले जात असून, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.पंचनामे करण्याची मागणीमुसळधार पावसाने लावणी केलेले भात व नागलीच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून, प्रशासनाने शासकीय यंत्रणेकडून तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात येत आहे. घाटात मोठी दरड कोसळल्याने दोन दिवसांपासून नाशिक - हरसूल मार्ग बंद होता. प्रवाशासह वाहनधारकांचे प्रचंड हाल होत होते. पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात दरड हटवण्यावरून कलगीतुरा सुरू असल्याने रस्ता मोकळा करण्यात विलंब झाला असल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)