शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातील एनएससीयू कक्षासाठी नव्याने मिळाले नऊ इन्क्युबेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 22:03 IST

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एनएससीयू कक्षासाठी नव्याने मिळालेले नऊ इन्क्युबेटर मंगळवारी (दि़३) सायंकाळपासून कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी दिली़ यामुळे जिल्हा रुग्णालयातील पूर्वीची १८ व नवीन ९ अशी २७ इन्क्युबेटर झाली आहेत़ तर आणखी सात इन्क्युबेटर येत्या दहा दिवसांत जिल्हा रुग्णालयास मिळणार आहेत. या ...

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एनएससीयू कक्षासाठी नव्याने मिळालेले नऊ इन्क्युबेटर मंगळवारी (दि़३) सायंकाळपासून कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी दिली़ यामुळे जिल्हा रुग्णालयातील पूर्वीची १८ व नवीन ९ अशी २७ इन्क्युबेटर झाली आहेत़ तर आणखी सात इन्क्युबेटर येत्या दहा दिवसांत जिल्हा रुग्णालयास मिळणार आहेत. या विभागात पाच महिन्यांत १८७ तर आॅगस्टमध्ये ५५ अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती़जिल्हा रुग्णालयातील या विभागातील अर्भकांचा प्रश्न माध्यमांनी मांडताच आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयास भेट दिली होती़ तर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कंपन्यांच्या सीएसआर निधीतून इन्क्युबेटर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते़ त्यानुसार चार दिवसांपूर्वी ९ इन्क्युबेटर प्राप्त झाले व तांत्रिक काम पूर्ण झाल्यानंतर मंगळवारपासून ते कार्यान्वित करण्यात आले़ यामध्ये लहान अर्भकांना या इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले आहे़जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू कक्षात वैद्यकीय अधिकारी, दोन बालरोगतज्ज्ञ व १८ अधिपरिचारिकांची नियुक्ती करण्यात आली होती़ तसेच नव्याने तयार झालेल्या इन्क्युबेटर्स कक्षासाठी जादा कर्मचारी नियुक्तीला मंजुरी दिली होती़ त्यानुसार १८ अधिपरिचारिकांना नियुक्तीचे आदेश देण्यात आल्याचे डॉ़ जगदाळे यांनी सांगितले़