शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नववर्ष स्वागत तयारी मद्यपींवर करडी नजर

By admin | Updated: December 31, 2015 23:56 IST

नववर्ष स्वागत तयारी मद्यपींवर करडी नजर

नाशिकरोड : परिसरामध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी युवा वर्गामध्ये विशेष उत्साह दिसून येत होता. नववर्षाच्या स्वागतानिमित्त हॉटेल, बिअरबार आदिंना विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर सायंकाळपासून मद्यपींवर करडी नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून तपासणी करण्यात येत होती. मावळते वर्ष व नववर्षाचा प्रारंभ हा गुरुवारी आल्याने नेहमीपेक्षा यंदा नववर्षाचे स्वागत करणाऱ्यांची संख्या रोडावली होती. युवावर्ग, कामगार, नोकरदार वर्ग आदि वेगवेगळ्या ग्रुपने नववर्षाच्या स्वागताचे खासगी ठिकाणी नियोजन केल्याचे चित्र दिसत होते. वादविवाद किंवा कुठलीही दुर्दैवी घटना घडू नये याची विशेष खबरदारी घेण्याकडे बहुतेकजणांचा कल दिसून येत होता. परिसरामध्ये व गावाबाहेरील ज्या हॉटेलमध्ये विना परवाना (सर्रासपणे) दारू विकली जाते किंवा बाहेरून आणलेली दारू पिऊ दिली जाते असे सर्व धाबे पोलिसांनी गुरुवारी बंद ठेवण्यास भाग पाडले होते. तसेच अंडाभुर्जीचे गाडे, चायनीज खाद्य पदार्थ विक्रीची दुकानेदेखील पोलिसांनी बंद ठेवली होती. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने हॉटेल, बिअर बार यांना विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली होती. काही हॉटेल्समध्ये डीजे, आॅर्केस्ट्रा आदिंचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळपासून पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून तपासणी सुरू केली होती. (प्रतिनिधी)