शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

नाशिककरांना नव्या वर्षाची ‘नवी भेट’

By admin | Updated: January 1, 2017 00:05 IST

नवे वर्ष नवी आशा : बसस्थानके टाकणार कात; पार्किंगची सुविधा मिळणार

नाशिक : नवे वर्ष नवे उमेद घेऊन येते त्यामुळेच सामान्यत: नव्या वर्षाविषयी नागरिकांना आकर्षण असते. व्यक्तिगत जीवनात ज्याप्रमाणे काही चांगले घडेल अशी अपेक्षा असते त्याच धर्तीवर सार्वजनिक जीवनातदेखील शहरासाठी, जिल्ह्यासाठी सकारात्मक घडण्याची अपेक्षा असते. यंदाही नववर्ष नाशिककरांना नव्या योजनांचे गिफ्ट घेऊन येणार आहे. या नव्या वर्षात शहरात अनेक योजनांची नांदी असून, शहरातील अनेक नवे प्रकल्प साकारले जाणार आहेत. शहरातील प्रमुख बसस्थानकांचे रुपडे पालटणार असून, विमानतळाच्या धर्तीवर त्यांचा विकास केला जाणार आहे. तसेच काही बसेस वायफाय केले जाणार आहेत. सामान्यत: नागरिकांच्या दृष्टिने महापालिकेशी संबंध येत असतो. नव्या वर्षात महापालिकेच्या वतीने डिजीटल कामकाजावर भर दिला जाणार असून ‘ई’पार्किंग, मॅकेनिकल पार्किंग तसेच महापुरा आधी सतर्क करणारी ई फ्लड सिस्टीम अंमलात येणार आहे. पोलिसांच्या वतीने विविध प्रकारच्या परवानग्या आॅनलाइन दिल्या जाणार आहेत.वायफाय बस, हायफाय स्थानकनवीन वर्ष प्रवाशांना विविध सुखसोयींसह प्रवास सुखकर करण्यावर भर देणारे असणार आहे. नाशिक शहराची प्रमुख ओळख असणारे जुने सीबीएस, मेळा बसस्थानक आणि महामार्ग बसस्थानकाचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. महामार्ग बसस्थानकावर अत्याधुनिक व सर्वसोयींयुक्त असा बसपोर्ट केला जाणार आहे. सटाणा-नाशिक व मालेगाव-नाशिक या बसेसच्या फेऱ्या वाढविल्या जाणार आहेत. बसमध्ये चढताना खिडकीतून रुमाल टाकून जागा धरण्याच्या प्रकाराला पूर्णपणे पायबंद घातला जाणार आहे. बस बसस्थानकात येताच सर्व खिडक्यांच्या काचा बंद केल्या जाणार असून, प्रवाशांनी दरवाजातून रांगेत चढूनच जागा पकडणे सक्तीचे केले जाणार आहे. याची शहरातील सर्व बसस्थानकांमध्ये कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. नाशिक परिक्षेत्रातील सर्व बसेसना मोफत वायफायची सुविधा दिली जाणार आहे. यात स्थानिक पातळीपासून लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्येही वायफायची सुविधा मिळणार आहे. याशिवाय ‘एसटीचा प्रवास- सुखकर प्रवास’ या ब्रीदवाक्यावर भर देत जास्तीत जास्त संख्येने प्रवासी एसटी महामंडळाच्या बसमधूनच प्रवास करतील यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी चालक, वाहक यांना उद्दिष्ट ठरवून दिले जाणार आहे.