शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी

By admin | Updated: December 29, 2015 23:13 IST

पार्ट्यांचे नियोजन : हॉटेल्सकडून पॅकेजेस्, खरेदीवर आॅफर्स

नाशिक : सरते वर्ष संपण्यात आणि नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही दोन दिवस शिल्लक असून, त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. शहराच्या विविध हॉटेलमध्ये रंगणाऱ्या पार्ट्यांसाठी विविध पॅकेजेस जाहीर करण्यात येत असून, सोशल मीडियावरही न्यू इयर्स इव्ह इफेक्ट जाणवत आहे.३१ डिसेंबर म्हणजे सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याची तयारी सुरू आहे. कुठे कौटुंबिक स्नेहमिलन, तर कुठे साग्रसंगीत पार्ट्यांच्या चर्चा झडत आहेत. शहरात नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीसाठी बाजारपेठाही सज्ज आहेत. विशेषत: शहरातील हॉटेल्स व्यावसायिकांनी वेगवेगळ्या आॅफर्स जाहीर केल्या आहेत. वाइन अ‍ॅन्ड डाईनचे पॅकेजेसही उपलब्ध आहेत. अगदी दोनशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतचे पॅकेज उपलब्ध आहेत. समवेत डान्स आणि म्युझिक शोदेखील होणार आहेत. काही हॉटेल चालकांचे सेलिब्रेटींना बोलविण्याचा प्रयत्न असून, वाइन अ‍ॅन्ड डाइन अशा शोचे तिकीटही अधिक ठेवण्यात येईल असे सांगण्यात आले. काही हॉटेल्समध्ये तर विशेष मेन्यूचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील मोठ्या हॉटेल्सप्रमाणेच अन्य छोट्या पार्सल पॉर्इंटवरही मागणी जोरात आहे. आगाऊ नोंदणी करणाऱ्यांना खास सवलत देण्यात येणार आहे.नव्या वर्षाच्या स्वागताचा बाजारपेठेवरही प्रभाव जाणवत असून, फ्लॅटपासून गृहोपयोगी वस्तू मोबाइल या साऱ्यांवरच मोठ्या आॅफर्स आल्या आहेत. आॅनलाइन शॉपिंगमध्येही अशाच प्रकारे आॅफर्स दिल्या जात आहेत, त्यामुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. (प्रतिनिधी)