शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मार्गशीर्ष गुरुवारमुळे नववर्ष जल्लोष थंड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:05 IST

देवगांव : यंदा कोरोनाचे विघ्न आणि ३१ डिसेंबरला आलेल्या मार्गशीर्ष गुरुवारमुळे नववर्षाचा जल्लोष थंड राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातच कोरोनामुळे शासनाकडून अद्यापही काही निर्बंध लागू असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ठळक मुद्देकोरोनाची भीती : हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंता

देवगांव : यंदा कोरोनाचे विघ्न आणि ३१ डिसेंबरला आलेल्या मार्गशीर्ष गुरुवारमुळे नववर्षाचा जल्लोष थंड राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातच कोरोनामुळे शासनाकडून अद्यापही काही निर्बंध लागू असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.सन २०२० मधील सर्वच सणांचा जल्लोष कोरोनाच्या वाढत्या विघ्नामुळे हवेत विरला. नागरिकांनी जबाबदारीने शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दीपोत्सवसारख्या सणांवर पाणी सोडले. आता ३१ डिसेंबरला तरी नववर्ष जल्लोष साजरा करायला मिळेल, अशी नागरिकांना अशा होती. मात्र, अद्याप कोरोना लस विकसित झाली नसल्याने यंदा नववर्षाचे स्वागत साध्या व मोजक्याच मित्रमंडळींच्या साथीने साजरा करावा लागणार आहे.

वर्षाच्या शेवटच्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार आल्याने बहुतेक सर्व नागरिक बुधवारीच नववर्ष जल्लोष साजरा करतील. हा जल्लोष साजरा होत असताना पोलिसांची मात्र त्यावर करडी नजर असणार आहे. दरवर्षी नववर्ष जल्लोष म्हटला की, ग्रामीण भागातील रिसॉर्ट, धाबे, हॉटेल यांसारखी ठिकाणे फुल्ल होतात. मात्र, यंदा कोरोनाविघ्नामुळे रिसॉर्ट, हॉटेलमध्ये अपेक्षित असे बुकिंग न झाल्याचे दिसत आहे.कोरोना विघ्नामुळे आर्थिक टंचाईचा सामना करावा लागलेला सामान्यवर्गही यावर्षी नववर्ष सेलिब्रेशनपासून दोन हात लांब राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मार्गशीर्ष गुरुवारमुळे मांसाहारींची कोंडी होणार आहे. महामारीनंतर लॉकडाऊन शिथिल करून रिसॉर्ट, हॉटेल,धाबे यांना परवानगी असली तरी, कोरोनाच्या धास्तीमुळे नागरिकांनी रिसॉर्ट, हॉटेल, धाबे याकडे पाठ फिरवली आहे.व्यावसायिकांना बसणार आर्थिक झळबुकिंग मंदावल्याने रिसॉर्ट, हॉटेल आणि धाबे व्यावसायिकांना आर्थिक झळ बसणार आहे. कोरोना अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आला नसल्याने मोठ्या पार्टीचे बेत आखताना नागरिकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. फिजिकल डिस्टनसिंग, मास्क यांसारख्या नियमांचे पालन करूनच नागरिकांना पार्टीचे बेत आखावे लागणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय