शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
5
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
6
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
7
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
8
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
9
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
11
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
12
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
13
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
15
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
16
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
17
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
18
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
19
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
20
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
Daily Top 2Weekly Top 5

कोंडीवर नवा उपाय : द्वारका चौकात सिग्नल कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 19:00 IST

द्वारका चौकात वाहतुक बेटाचा आकार कमी करत सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी होत होती. काही दिवसांपुर्वी येथील वाहतूक बेट लहानही करण्यात आले. सिग्नल यंत्रणाही या चौकात आता कार्यान्वित झाली आहे.

ठळक मुद्दे१२० सेकंद थांबावे लागणारचकोंडीला आळा बसण्यास मदत होईल

नाशिक : शहराच्या वाहतूकीच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा आणि १७ रस्ते एकत्र जेथे येतात त्या द्वारका चौकात आता सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. यामुळे द्वारकेवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.द्वारका चौक हे शहराचे प्रवेशद्वार मानले जाते. महामार्ग प्राधिकरणाच्या मदतीने द्वारका चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. आठवडाभरापासून या चौकात सिग्नलचे दिवे लागले आहे. बुधवारी (दि.१५) सिग्नलच्या उद्घाटनाची औपचारिकताही पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पुर्ण करण्यात आली.द्वारकेची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी यापुर्वीही विविध उपाययोजना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आल्या. रस्ते एकेरी करणे, रिक्षा थांबे स्थलांतरीत करणे, अवैधरित्या थांबणाऱ्या बसेस, टॅक्सींवर कारवाई करणे, भुयारी मार्ग वापरात आणण्यासाठी प्रयत्न अशा विविध उपाययोजना करण्यावर भर दिला गेला. यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटण्यास मदतही झाली. अवजड वाहतूकीच्या द्वारकावरील प्रवेशाबाबतही वेळेचे निर्बंध घालण्यात आले. पुणे महामार्गावरून येणारी अवजड वाहतूक पर्यायी रिंगरोडवरून वळविण्यात आली.द्वारका चौकात वाहतुक बेटाचा आकार कमी करत सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी होत होती. काही दिवसांपुर्वी येथील वाहतूक बेट लहानही करण्यात आले. सिग्नल यंत्रणाही या चौकात आता कार्यान्वित झाली आहे. यामुळे वाहतूक कोंडीला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास शहर वाहतूक नियंत्रण शाखेला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयTrafficवाहतूक कोंडी