लोकमत न्यूज नेटवर्कखेडलेझुंगे : रु ई-कोळगाव रस्त्यावरील वस्तीतील रोहित्राच्या दुरवस्थेचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच महावितरण कंपनी खडबडून जागी झाली. तातडीने सदर ठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.खंडेराव नरहरी गवळी यांच्या वस्तीवर वीज महावितरण कंपनीचे रोहित्र आहे. रोडलगत असलेल्या या रोहित्राची अत्यंत दुरवस्था झाली होती. तेथील वीज वितरण कंपनीने तेथील रोहित्रातील जुनाट सडलेली आणि उघडी पेटी बदलून नवीन पेटी बसविली आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशी शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वीज वितरण कंपनीच्या देवगांव उपकेंद्राच्याअंतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रातील रोहित्रांचा बोजबारा वाजलेला आहे. वारंवारतक्रारी, पदाधिकारी यांनी समक्ष, फोनद्वारे केलेली कानउघडणीचाही कोणताही परिणाम या अधिकारी कर्मचाºयांवर झाल्याचा दिसून येत नाही. उघडे रोहित्र, तुटलेल्या तारा यांमुळे परिसरातून अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.परिसरातील रोहित्रांची वीज वितरण कंपनीकडून पाहणी होऊन त्यांचीही अशाप्रकारे दुरु स्ती करावी, अशी आशा व्यक्त केली आहे. शेतातील तिरपे झालेले खांब, दोन खांबांमधील तारांचे पडलेले झोल, रोहित्रांवरील नादुरु स्त पेट्या, शाळा, हॉस्पिटल परिसरातील सडलेले,उघडे असलेले आणि कमी उंचीवर असलेल्या धोकादायक पेट्या, रोहित्र आॅइल डब्बे यांची पहाणी होऊन तात्काळ दुरु स्ती करण्याचे कामकाजकरणे गरजेचे आहे.
रुई वस्तीत बसविले नवीन रोहित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 23:10 IST
खेडलेझुंगे : रु ई-कोळगाव रस्त्यावरील वस्तीतील रोहित्राच्या दुरवस्थेचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच महावितरण कंपनी खडबडून जागी झाली. तातडीने सदर ठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
रुई वस्तीत बसविले नवीन रोहित्र
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये समाधान : महावितरण कंपनीकडून तातडीने दखल