शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

बनावट कंपनीद्वारे कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी नव्याने चौकशी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:33 IST

मालेगाव येथील ‘सार्वजनिक बांधकाम विभाग वेब मॅनेजमेंट’ या बनावट कंपनीद्वारे १२० बेरोजगार तरुणांच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी नव्याने चौकशी समिती स्थापन करून त्याचा अहवाल शिफारशींसह महिनाभरात शासनास सादर करण्याचा निर्णय विधान परिषदेत घेण्यात आला.

नाशिक : मालेगाव येथील ‘सार्वजनिक बांधकाम विभाग वेब मॅनेजमेंट’ या बनावट कंपनीद्वारे १२० बेरोजगार तरुणांच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी नव्याने चौकशी समिती स्थापन करून त्याचा अहवाल शिफारशींसह महिनाभरात शासनास सादर करण्याचा निर्णय विधान परिषदेत घेण्यात आला.  मालेगाव येथे ‘सार्वजनिक बांधकाम वेब मॅनेजमेंट’ नावाची बनावट कंपनी स्थापन करून १२० बेरोजगारांची खोट्या नियुक्ती पत्राद्वारे कोट्यवधी रूपयांची फसवणूक झाली होती. याविषयी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी विधान परिषदेच्या चर्चेत तारांकित प्रश्न उपस्थित केला असता या प्रकरणाची स्वतंत्र माजी न्यायाधीश किंवा माजी मुख्य सचिव अथवा बांधकाम विभागाच्या माजी प्रधान सचिवामार्फत चौकशी करावी. तसेच सदर प्रकरणाशी बांधकाम खात्यातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा काही संबंध आहे का याची सखोल तपासणी करून शिफारशींसह अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात २६ जून २०१८ रोजी शासन निर्णयान्वये सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश संजीव पाठक यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. तथापि, पाठक यांनी या कामकाजासाठी असमर्थता दर्शवल्याने बुधवारी नव्याने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.देशपांडे यांची नियुक्ती‘वेब मॅनेजमेंट’ या बनावट कंपनीद्वारे झालेल्या फसवणूक प्रकरणाच्या चौकशीसाठी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश सोपान देशपांडे यांच्या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीला चौकशीसाठी महिनाभराचा अवधी देण्यात आला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीMalegaonमालेगांव