शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लखमापूर ग्रामपंचायतीवर नवीन चेहऱ्यांची वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:17 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील पंचवार्षिक निवडणुकीत नवीन चेहऱ्यांनी बाजी मारली आहे. अटीतटीच्या या निवडणुकीत दोन माजी ...

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील पंचवार्षिक निवडणुकीत नवीन चेहऱ्यांनी बाजी मारली आहे. अटीतटीच्या या निवडणुकीत दोन माजी सरपंचांचा पराभव झाल्याने आता गावगाड्याची सूत्रे नवीन चेहऱ्यांकडे लखमापूरवासीयांनी दिली आहेत.

लखमापूर ग्रामपंचायतीत एकूण १३ सदस्य असून, ५ प्रभागरचना तयार करण्यात आली होती. त्यापैकी तीन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने १० जागांसाठी एकूण २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत होते. त्यात पुरुष मतदार संख्या १६०१ एवढी होती, तर महिला मतदार संख्या १४६६ इतकी होती, तर एकूण मतदार ३०६७ एवढे होते. यंदाच्या निवडणुकीत माजी सरपंच ज्योती विजयराव देशमुख व माजी सरपंच मंगला रावसाहेब सोनवणे या दोन माजी सरपंचांचा पराभव झाल्याने तसेच माजी उपसरपंच बाळासाहेब शिवाजी देशमुख यांनी बाजी मारल्याने आता लखमापूर ग्रामपंचायतीवर नवीन चेहऱ्यांची वर्णी लागली आहे. (१८ लखमापूर)

--------------

विजयी उमेदवार व प्रभाग पुढीलप्रमाणे :-

प्रभाग क्रमांक : १ सोमनाथ बदादे : (विजयी), सुमनताई रेहरे (बिनविरोध). प्रभाग क्रमांक : २ भिकन राजदेव : (विजयी), स्वाती दळवी (बिनविरोध), प्रभाग क्रंमाक : २ राजेंद्र देशमुख : (विजयी), प्रभाग क्रमांक : ३ भाऊसाहेब मेसट : (विजयी), ज्योती मोगल : (विजयी), जया मोगल (बिनविरोध) प्रभाग : ४ किशोर सोनवणे : (विजयी), प्रभाग : ४ पुष्पा सोनवणे : (विजयी), प्रभाग : ४ संगीता देशमुख : ( विजयी). प्रभाग क्रमांक : ५

बाळासाहेब शिवाजी देशमुख:- (विजयी), प्रभाग क्रमांक:-५ शालिनी सोनवणे:- (विजयी)

-------------------

दोन माजी सरपंच ज्योती देशमुख, मंगला सोनवणे व माजी सरपंच सुभद्रा देशमुख यांचे चिरंजीव मेघराज देशमुख यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत नवीन चेहऱ्यांची वर्णी लागली आहे. आता सरपंच कोण? याकडे सर्व लखमापुर जनतेचे लक्ष लागले आहेत.

===Photopath===

180121\18nsk_6_18012021_13.jpg

===Caption===

१८ लखमापूर