शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गाव समिती स्थापून कोरोनाविरुद्ध सरसावले नवी बेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 21:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कळवण : कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नवी बेज गावकऱ्यांनी कोरोनासाठी लढा देण्यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंध समिती स्थापन केली आहे. या प्रकारचा निर्णय घेणारे नवी बेज हे राज्यातील पहिलेच गाव मानले जात आहे.

ठळक मुद्देराज्यातील पहिलेच गाव : दंडात्मक कारवाईचा नियम, शंभर टक्के लॉकडाउन

मनोज देवरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नवी बेज गावकऱ्यांनी कोरोनासाठी लढा देण्यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंध समिती स्थापन केली आहे. या प्रकारचा निर्णय घेणारे नवी बेज हे राज्यातील पहिलेच गाव मानले जात आहे.कोरोना प्रतिबंध समितीने नवी बेज गावकऱ्यांसाठी नियमावली तयार केली आहे. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करून शंभर टक्के लॉकडाउन करण्याचा निर्धार केला आहे. शिवाय बाहेरगावाहून आलेल्यांना घरातच बसण्याची सूचना करून संपूर्ण गाव लॉकडाउन केल्यामुळे गावात सर्वत्र शुकशुकाट आहे. याबाबत सोमवारी प्रगतिशील शेतकरी घनश्याम पवार यांच्या अध्यक्षतेखाली नवी बेज ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत गाव शंभर टक्के लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला.नवी बेज गावातून पुणे, मुंबई यांसारख्या शहरात कामासाठी गेलेले गावकरी गावाकडे येत आहेत. गावात आलेल्या या गावकºयांची नोंद घेण्यात आली असून, त्याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. शिवाय घराबाहेर पडू नका अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.या बैठकीत कोरोना प्रतिबंध समितीच्या अध्यक्षपदी घनश्याम पवार यांची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सखाराम गोधडे, उपसरपंच तथा मविप्र संचालक अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीसपाटील, व्यावसायिक व ग्रामस्थ उपस्थित होते.बैठकीत घेतले निर्णय गावकºयांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन नवी बेज कोरोना प्रतिबंध समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, त्यात ग्रामस्थांनी वारंवार हात धुणे, शिंकताना व खोकताना तोंडाला रु माल, मास्क बांधणे, घरासमोर व दारासमोर साबण व पाण्याची बादली भरून ठेवणे, बाहेरून आल्यानंतर घरात जाण्यापूर्वी हात, पाय, तोंड साबणाने धुणे, गावात अनावश्यक फिरू नये, गावात घोळका करून बसू नये, आपापल्या घरात थांबावे, घराची व परिसराची रोज साफसफाई करावी, सर्दी-खोकला-ताप आल्यास तत्काळ डॉक्टरांना भेटावे, गावात बाहेरून आलेल्या नागरिकांनी घरात थांबावे व कुटुंबातील व्यक्तीपासून दूर राहावे, भाजीपाला, किराणा, औषधे यांची योग्य दराने विक्र ी करताना ग्राहकांनी वस्तू घेताना सामाजिक अंतर ठेवावे, नियमांचे पालन केले नाही तर नियुक्त स्वयंसेवक दंडात्मक कारवाई करतील, सार्वजनिक जागेवर व ओट्यावर बसून गप्पा मारणे बंद करावे, गावात अवैध दारू विक्र ी बंद करावी, असे निर्बंध लादण्यात आले आहेत. सूचना व नियमाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत