शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीकडे दुर्लक्ष : वैद्यकीय विभागाकडून तातडीने चौकशी इंदिरा गांधी रुग्णालयात पुन्हा निष्काळजीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:20 IST

नाशिक : महापालिकेच्या पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात मागील सप्ताहात निष्काळजीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि. २७) पुन्हा एकदा एका महिलेच्या प्रसूतीकडे ड्यूटीवरील डॉक्टरांसह कर्मचाºयांकडून दुर्लक्ष झाल्याचा प्रकार घडला.

ठळक मुद्देसदर महिलेच्या पोटात कळा प्रसूतीवेळी त्रास झाल्याचा आरोप

नाशिक : महापालिकेच्या पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात मागील सप्ताहात निष्काळजीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि. २७) पुन्हा एकदा एका महिलेच्या प्रसूतीकडे ड्यूटीवरील डॉक्टरांसह कर्मचाºयांकडून दुर्लक्ष झाल्याचा प्रकार घडला. सदर महिलेच्या नातेवाइकाने ओरड केल्यानंतर वैद्यकीय विभागाने या प्रकाराची तत्काळ चौकशी केली आणि निष्काळजीपणा झाल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगण्यात आले.पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली. सदर महिलेच्या पोटात कळा येत असल्याने तिच्यासोबत आलेल्या महिला नातेवाइकाने तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांना महिलेची तपासणी करण्याची विनंती केली. परंतु, ड्यूटीवर असलेली परिचारिका बघेल, असे सांगत डॉक्टरने दाद दिली नाही, तर परिचारिकेनेही आॅन कॉल डॉक्टर आल्याशिवाय हात लावणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे महिलेला प्रसूतीवेळी त्रास झाल्याचा आरोप सदर महिलेच्या नातेवाइकाने केला. यावेळी सदर नातेवाइकाने रुग्णालयात आरडाओरड करत गोंधळही घातला. दरम्यान, महिलेची प्रसूती होऊन जन्माला आलेल्या बाळाची स्थिती पाहून त्याला बिटको रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. या साºया घटनेची वाच्यता होताच माध्यमांमध्येही त्याची खबर पोहोचली. त्यानंतर वैद्यकीय विभागाचे अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी तातडीने संबंधित डॉक्टरांसह परिचारिकांना कार्यालयात पाचारण करत चौकशी केली. परंतु, सदर महिलेच्या प्रसूतीकडे दुर्लक्ष झाले नसल्याचा खुलासा वैद्यकीय विभागाकडून करण्यात आला. मात्र, कर्मचाºयांकडून रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना चांगली वागणूक मिळाली नसेल, याची शक्यताही बोलून दाखविण्यात आली.