शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मिळते घरचे जेवण

By admin | Updated: February 11, 2017 00:43 IST

बंधुभावाची शिकवण : मनोहर रुग्ण सेवा केंद्रातर्फे एक तपापासून सुरू आहे अन्नपूर्णा योजनेचा उपक्रम

 नाशिक : नॅशनल असोसिएशन आॅफ कॅथॉलिक चॅप्लेन्स या जागतिक संघटनेच्या पुढाकाराने ११ फेब्रुवारी हा दिवस जागतिक रुग्णदिन म्हणून साजरा करण्यात येतो. रुग्णाच्या कल्याणासाठी आणि आरोग्यासाठी सर्व समाजाने झटावे याचे स्मरण करून देणारा हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील या दिनाला मान्यता दिली आहे. रुग्णदिनाच्या निमित्ताने रुग्णांच्या हक्कांविषयी कर्तव्यबुद्धीने विचार करायला हवा, असे मत सामाजिक संघटना व्यक्त करतात. परंतु काही सेवा भावी संस्था खऱ्या अर्थाने रुग्णाची सेवा करतात. मनोहर रुग्ण सेवा केंद्राच्या वतीने रुग्णसेवेचा वसा घेऊन एकतपापासून अन्नपूर्णा योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण तसेच वनवासी भागातून जे रुग्ण नाशिक शहरात वैद्यकीय तपासणीसाठी किंवा औषधोपचारासाठी येतात. तेव्हा काही वेळा नियोजनाअभावी किंवा आर्थिक पेच प्रसंगामुळे रुग्णांच्या नातेवाइकांचे शासकीय जिल्हा रुग्णालयात आल्यावर जेवणाचे आणि अन्य व्यवस्थेचे फार हाल होतात. अशावेळी त्यातील अत्यंत गरजू व्यक्तींना शोधून त्यांना बंधुत्वाच्या भावनेतून घरचे जेवण उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असे म्हटले जाते. महात्मा गांधी यांनी स्वत: कुष्ठरुग्णांची सेवा केली. रुग्णाच्या वेदना कमी करण्याचे काम डॉक्टर करतात, परंतु त्यांना बर वाटण्यासाठी मानसिक आधार देण्याच काम खूप मोलाचे असते. तसेच रुग्णांना घरचे जेवण उपलब्ध करून देणे, फळे किंवा औषधी आणून देणे ही कामे महत्त्वाची असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती संचलित मनोहर रुग्ण सेवेच्या वतीने गेल्या एक तपापासून अन्नपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)