शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शिक्षणापलीकडचे आयुष्य शिकविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:49 IST

नाशिक : मूल्यवर्धन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणापलीकडचे आयुष्य शिकवायचे आहे. जे भविष्यात स्वत:च्या सद्सदविवेक बुद्धीने समाजात वागतील, वावरतील अशी ...

ठळक मुद्देविशाल सोळंकी : मूल्यवर्धन जिल्हा मेळावा उत्साहात

नाशिक : मूल्यवर्धन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणापलीकडचे आयुष्य शिकवायचे आहे. जे भविष्यात स्वत:च्या सद्सदविवेक बुद्धीने समाजात वागतील, वावरतील अशी पिढी आपल्याला घडवायची आहे, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी केले.महाराष्टÑ शासन शालेय शिक्षण विभाग आणि शांतिलाल मुथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कालिदास कलामंदिरात आयोजित मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधकृष्ण गमे, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, शांतिलाल मुथा फाउंडेशनचे संस्थापक शांतिलाल मुथा, जिल्हा शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी देवीदास महाजन, निरंतर शिक्षणचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव, फाउंडेशनचे जिल्हा प्रमुख नंदकिशोर साखला, मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटरमण आदी मान्यवर उपस्थित होते.विशाल सोळंकी म्हणाले, दीडशे वर्षात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सुमारे ६ कोटी लोकांनी बलिदान दिले. आपण सर्व स्वातंत्र्यानंतर जन्माला आलो असल्याने आपल्याला सर्व मोफत मिळाले आहे. यासाठी आपण भावी पिढीला चांगली मूल्ये देऊ शकलो आणि ही मूल्ये घेऊन विद्यार्थी आयुष्यात पुढे गेले तर आपल्या कार्याला खऱ्याअर्थाने अर्थ प्राप्त होईल. मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शांतिलाल मुथा यांच्या कार्याचा गौरव करून मूल्यवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकातील मुलांना याचा फायदा देण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांचेही यावेळी भाषण झाले.प्रारंभी मूल्यवर्धन पोस्टर्स प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आयुक्त विशाल सोळंकी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून जिल्हा मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. फाउंडेशनचे जिल्हा प्रमुख नंदकिशोर साखला यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात शांतिलाल मुथा यांनी मूल्यवर्धनचा प्रवास कथन केला. मेळाव्यास जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि नगरपालिका, महानगरपालिका शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक चोपडा, यतीश डुंगरवाल, ललित सुराणा, अभय ब्रह्मेचा, चंद्रशेखर चोरडिया, जगन्नाथ सोनटक्के, अशोक पवार, भाऊसाहेब शेळके, हनुमान शिकारे, सुकन्या भामरे आदींनी परिश्रम घेतले.८००च्या वर पोस्टर्स प्रदर्शितमूल्यवर्धन पोस्टर्स प्रदर्शनात मूल्यवर्धन शिक्षकांनी बनविलेले ८०० च्या वर पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. कालिदास कलामंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत दि. १४ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शालेय विद्यार्थी, पालकांना प्रदर्शन पाहण्यासाठी खुले राहणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र