शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जमीन व्यवहारात कायद्याचा अभ्यास गरजेचा

By admin | Updated: December 9, 2015 23:45 IST

रिअल्टर्स डे : ‘एआरसी’च्या परिसंवादात उमटला सूर

नाशिक : जमिनीच्या खरेदी-विक्रीबाबत अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. जेणेकरून फसवणूक टाळता येणे शक्य होईल. तसेच जमिनीचे व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांनी स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीच्या कायद्याचा सखोल अभ्यास ठेवणे काळाची गरज असल्याचा सूर परिसंवादात उमटला.सोशल वेल्फेअर असोसिएशन आॅफ रिअल इस्टेट कन्सल्टंट (एआरसी) यांच्यातर्फे संध्याकाळी महाकवी कालिदास कलामंदिर येथे ‘सातबारा रिअल्टर्स डे’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अजित मराठे, कायदेतज्ज्ञ एम. डी. कुलकर्णी, नॅशनल असोसिएशन आॅफ इंडियाचे पश्चिमप्रमुख विनोद ठक्कर, रवि वर्मा, अ‍ॅड. नीळकंठ अहेर, जय पटेल, सुजॉय गुप्ता, प्रवीण फणसे आदि उपस्थित होते.कुळकायदा, रीत, भोगवटा, जमीन कमाल धारणा कायदा, तळेगाव दाभाडे योजना, वारसा हक्क, स्त्रियांचे हक्क व अधिकार, आदिवासी जमीन विषयक कायदा, घटनात्मक निवाडे आदिंबाबत कुलकर्णी यांनी माहिती दिली. तसेच ठक्कर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, काही वर्षांपूर्वी जमिनीविषयक व्यवहार करणाऱ्यांना ‘दलाल’ असे म्हटले जात होते; मात्र काळानुरूप हा शब्दप्रयोग बदलला असून, ब्रोकर, रिअल्टर्स असे शब्दप्रयोग वापरले जात आहेत. त्यामुळे या व्यवसायातील लोकांना आगळा नावलौकिक प्राप्त होऊ लागला आहे. रिअल्टर्सकडून समाजात संबंध अधिकाधिक प्रस्थापित करून पारदर्शक व्यवहारावर भर दिल्यास त्यांच्यावरील जनमानसाचा विश्वास वाढण्यास मदत होईल, असे वर्मा यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी उपस्थित रिअल्टर्सकडून विविध प्रश्नांच्या माध्यमातून शंकांचे निरसन करून घेण्यात आले. सूत्रसंचालन सुमित्रा महाजन यांनी केले.