शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार बंद उद्योगांवर तोडगा काढण्याची गरज

By admin | Updated: June 1, 2017 01:49 IST

सातपूर : गेल्या दहा ते पंधरा वर्षांत मोठा उद्योग प्रकल्प जिल्ह्यात आलेला नाही. मात्र याच कालावधीत वर्षात जवळपास पाचशे लघु आणि मध्यम उद्योग बंद पडलेले आहेत.

 गोकुळ सोनवणे । लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : गेल्या दहा ते पंधरा वर्षांत मोठा उद्योग प्रकल्प जिल्ह्यात आलेला नाही. मात्र याच कालावधीत वर्षात जवळपास पाचशे लघु आणि मध्यम उद्योग बंद पडलेले आहेत. हे बंद उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज असून, तसे झाल्यास बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरू होतील, त्याचबरोबर कारखान्यांची थांबलेली चाके पुन्हा सुरू होतील. नाशिकमध्ये बंद पडलेले उद्योग ही गंभीर समस्या आहे. चुकीचे व्यवस्थापन, वित्तीय संस्थांचे कर्ज, कामगार कलह, कर्जबाजारी, शासनाचे धोरण, युनियन व्यवस्थापन यांच्यातील वाद अशा अनेक कारणांचा समावेश आहे. असे कारखाने बंद पडून कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बंद पडलेले कारखाने ओस पडले आहेत. अशी भकास परिस्थिती पहावयास मिळत आहे. सदरचे बंद कारखाने सुरू करण्यासाठी त्या त्या पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.बंद उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडूनच प्रयत्न व्हावेत, यासाठी एक मागणी आहे, परंतु वेगवेगळ्या पातळीवर शासनाने अद्याप हस्तक्षेप केलेला नाही. वादग्रस्त बंद पडलेले कारखाने एमआयडीसी ताब्यात घेऊ शकत नाही, असे शासनाचे धोरण असल्याचे सांगितले जाते. परंतु ज्यांनी उद्योग सुरू करण्यासाठी भूखंड घेऊन ठेवलेले आहेत, असे भूखंड तरी नियमाप्रमाणे ताब्यात घेणे गरजेचे आहे. बंद पडलेले उद्योग आणि रिक्त भूखंड ताब्यात घेतले तरी अनेक मोठे उद्योग प्रकल्प उभे राहू शकतात. एमआयडीसीने आतापर्यंत रिक्त भूखंडधारकांना फक्त नोटिसा बजावून कागदी घोडे नाचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिल्ह्यात असे किती तरी उद्योजक आहेत जे भाड्याच्या जागेत कसाबसा उद्योग चालवीत आहे. अशा उद्योजकांना जागा दिल्यास नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.