शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

धर्मनिरपेक्षतेची लढाई लढण्याची गरज - दाभोलकर

By admin | Updated: December 23, 2014 22:14 IST

धर्मनिरपेक्षतेची लढाई लढण्याची गरज - दाभोलकर

मालेगाव : धर्माच्या नावावर अधर्मतेचे खेळ पसरविणारेच सत्तेत येऊ पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्यायाची आणि धर्मनिरपेक्षतेची लढाई लढण्याची गरज असून, सामाजिक अभिसरणासाठी तरुणांनी सज्ज व्हावे, असे आवाहन अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी येथे केले.प. बा. काकाणीनगर वाचनालयात ग्रंथालय सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ‘वसा विवेकाचा’ या विषयावर ते बोलत होते. अजय शाह अध्यक्षस्थानी होते. मामको बँकेचे चेअरमन राजेंद्र भोसले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.दाभोलकर म्हणाले, विवेककारण हीच या देशाच्या भावी सुदृढ समाजाची पायाभरणी असून, धार्मिक अतिरेक, भ्रष्टाचार, जाती, धर्मभेद यांचे मूळ मानवाच्या अविवेकात आहे. आज विवेकवादाची गरज आहे. त्यामुळे धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा करावी लागेल. धर्माची राजकीय दुकानदारी सुरू राहावी म्हणून काही धर्ममार्तंडांनी कर्मकांड आणि देवाला लाच देण्याच्या प्रतिमेमध्ये समाजाला अडकवून ठेवले आहे. धर्माची विवेकवादी चिकित्सा हीच विज्ञानाची खरी जननी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अठरा वर्षे झगडून डॉ. नरेंद्र दाभोलकरांना बलिदान द्यावे लागले. यातून शासनाचा नाकर्तेपणा सिद्ध होतो. सामाजिक, राजकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती पंचवीस वर्षांपासून व्यापकरीत्या कार्य करत आहे. जादूटोणाविरोधी कायदा संमत होऊन एकच वर्षात सव्वाशे गुन्ह्यांची नोंद झाली आहे व यातच अंनिसचे यश आहे, असेही दाभोलकर यावेळी म्हणाले. प्रारंभी रविराज सोनार यांनी डॉ. दाभोलकर यांचा परिचय करून दिला. (प्रतिनिधी)