शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या शोषणमुक्तीची गरज

By admin | Updated: July 10, 2017 23:21 IST

देसरडा : शेतकरी आंदोलनाविषयी भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : : शेतकरी आत्महत्येची वाढती आकडेवारी पाहता सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह बाजारमुक्ती व शोषणमुक्तीचे धोरण स्वीकारण्याची गरज असून, विकासाच्या नावाखाली सुरू असलेले कृषी क्षेत्रातील कंपनीकरण थांबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकार परिषदेत केले.राज्य सुकाणू समितीच्या बैठकीसाठी नाशिक येथे आले असता प्रा. देसरडा यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करताना शेतकरी आंदोलनाविषयी त्यांची भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही वर्षांत शेतीचे औद्योगिकीकरण व रासायनिकीकरण झाल्याने शेती क्षेत्र संकटात सापडले आहे. नाशिकचा विचार केला तर येथे बहुपीक पद्धतीचा अवलंब केल्याने येथील गुंता अधिक आहे. यासाठी शेती संसाधनाचे उद्ध्वस्तीकरण, वातावरणातील बदल, बदलती बाजारातील समीकरणे, सरकार व बाजार एकत्रित होत शेतकऱ्यांची चाललेली लूट, अन्नसाखळी विखंडित झाली या कारणांसह सध्या वेगवेगळ्या योजनांच्या नावाखाली सरकारकडून सुरू असलेली शेतकऱ्यांची ससेहोलपट थांबविणे गरजेचे असल्याचे देसरडा यांनी सांगितले. या कारणांमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात असल्याने पर्यायाने आत्महत्येकडे ढकलला जात आहे. या परिस्थितीस आजी-माजी सरकारची काही धोरणे कारणीभूत असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणा आणि आत्महत्येच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी कर्जमुक्ती व बाजारमुक्ती सोबतच शेतकऱ्यांची शोषणमुक्तीही गरजेची आहे. शेती क्षेत्रासंबंधी सरकारच्या आणि बाजाराच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे अडचणीची सरकारी धोरणे, बाजारप्रक्रियेतील समस्या व या दोहोंमधील साखळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी शेतकरी स्वायत्त होणे गरजेचे आहे. जागतिक हवामान बदलाच्या संकटाने त्रस्त शेतकऱ्यांना कर्जाच्या, नफेखोरीच्या बाजाराच्या व सरकार आणि बाजारातील यंत्रणांकडून होणाऱ्या शोषणाच्या जोखडातून मुक्त करण्याची गरजही प्रा. देसरडा यांनी व्यक्त केली.