शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार कोटींची गरज : गुदामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:28 IST

मक्याचे पैसे देण्यास शासनाकडून खळखळ !नाशिक : शेतकºयांच्या मक्याला आधारभूत किमतीत खरेदी करण्याचे आश्वासन देऊन गावोगावी खरेदी केंद्रे सुरू करणाºया सरकारने आता खरेदी केलेल्या मक्याचे पैसे शेतकºयांना देण्यासाठी खळखळ चालविली असून, दोन महिने उलटूनही शेतकºयांना मक्याचे पैसे न मिळाल्याने त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. दुसरीकडे नोंदणी केलेला मका खरेदी करण्याचे ठरवूनही शासनाकडून गुदाम उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे शेतातील उघड्या मक्याचा दर्जाही खालावत चालल्याने अस्वस्थेत आणखी भर पडली आहे.

ठळक मुद्दे मक्याला आधारभूत किमतीत खरेदी करण्याचे आश्वासन शेतकºयांना मक्याचे पैसे न मिळाल्याने त्यांच्यात अस्वस्थता

मक्याचे पैसे देण्यास शासनाकडून खळखळ !नाशिक : शेतकºयांच्या मक्याला आधारभूत किमतीत खरेदी करण्याचे आश्वासन देऊन गावोगावी खरेदी केंद्रे सुरू करणाºया सरकारने आता खरेदी केलेल्या मक्याचे पैसे शेतकºयांना देण्यासाठी खळखळ चालविली असून, दोन महिने उलटूनही शेतकºयांना मक्याचे पैसे न मिळाल्याने त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. दुसरीकडे नोंदणी केलेला मका खरेदी करण्याचे ठरवूनही शासनाकडून गुदाम उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे शेतातील उघड्या मक्याचा दर्जाही खालावत चालल्याने अस्वस्थेत आणखी भर पडली आहे.राज्य सरकारने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आधारभूत किमतीत म्हणजेच १,४२५ रुपये क्विंटल दराने मका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी शेतकºयांना आॅनलाइन नोंदणी करण्यास भाग पाडले. नाशिक जिल्ह्णात जवळपास २५ हजारांहून अधिक शेतकºयांनी मका विक्री करण्यासाठी नोंदणी केली होती. नोव्हेंबर महिन्यापासून आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करण्याचे ठरविलेले असताना प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाकडून पणन महामंंडळाला शासकीय गुदामे उपलब्ध करून देण्यास विलंब लावल्यामुळे एक महिना उशिरा म्हणजे डिसेंबरमध्ये जिल्ह्णात दहा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली.शासनाने मात्र ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी करणाºया शेतकºयांचाच मका खरेदी करण्याचा ऐनवेळी निर्णय घेतल्याने जिल्ह्णातील शेतकºयांमध्ये धावपळ उडाली. कारण बहुतांशी शेतकरी कांदा लागवडीत व्यस्त असल्यामुळे त्यांनी मका काढणी व विक्रीकडे दुर्लक्ष केले, परिणामी लाखो क्विंटल मका खरेदीविना पडून राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने शासनाने जानेवारीतही मका खरेदी सुरू ठेवली.आजवर ८०,६३५ क्व्ािंटल मका खरेदी करण्यात आला असून, त्या पोटी साडेसहा कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु सरकारने मध्यंतरी निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत महिनाभर पैसेच न दिल्यामुळे सुमारे दीड हजारांहून अधिक शेतकºयांचे साडेचार कोटी रुपये मिळालेले नाहीत. दोन महिने उलटूनही पैसे मिळत नसल्याचे शेतकºयांचा धीर सुटत चालला आहे. गुदामांचा प्रश्न पुन्हा उपस्थितजिल्ह्णात नोंदणी केलेल्या मका उत्पादक जवळपास दोन हजार शेतकºयांचा सुमारे ६० हजार क्व्ािंटल मका अद्यापही खरेदीच्या प्रतीक्षेत असून, फेब्रुवारी महिन्यातही खरेदी केंद्रे सुरूच ठेवण्याचा निर्णय पणन महामंडळाने घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्णात मका खरेदी सुरू असल्याने व विक्रमी संख्येने मका खरेदी करण्यात आल्याने ते ठेवण्यासाठी गुदामांचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.