शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दोनवेळ पाणीपुरवठ्यास मनपा प्रशासनाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 19:03 IST

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात मुबलक पाणीसाठा असल्याने दोनवेळ पाणीपुरवठा करण्याची शिवसेनेने केलेली मागणी प्रशासनाने फेटाळून लावली आहे. सद्यस्थितीतील पाणी वितरण व्यवस्था सुरळीत असल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला आहे.यंदा गंगापूर धरणासह मध्यम प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे, शहरात दोनवेळ पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्तांची ...

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात मुबलक पाणीसाठा असल्याने दोनवेळ पाणीपुरवठा करण्याची शिवसेनेने केलेली मागणी प्रशासनाने फेटाळून लावली आहे. सद्यस्थितीतील पाणी वितरण व्यवस्था सुरळीत असल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला आहे.यंदा गंगापूर धरणासह मध्यम प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे, शहरात दोनवेळ पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन केली होती. परंतु, सद्यस्थितीत शहरात एकवेळ सुरू असलेला पाणीपुरवठा योग्य असल्याचे समर्थन प्रशासनाने केले आहे. सद्यस्थितीत पंचवटी, नाशिकरोड तसेच पूर्व विभागातील काही भागांत दोनवेळ पाणीपुरवठा केला जात आहे, तर अन्यत्र एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. सर्वसाधारणपणे दीड ते अडीच तास पाणीपुरवठ्याची वेळ आहे. शहरात १०९ जलकुंभ असून ते भरण्याकरिता लागणारा वेळ आणि वितरण व्यवस्थेकरिता आवश्यक असलेली साधनसामुग्री व मनुष्यबळ पाहता दोनवेळ पाणीपुरवठा करणे शक्यच नसल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. शहरात दोनवेळ पाणीपुरवठा केल्यास वितरण व्यवस्था विस्कळीत होऊन नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आलेली आहे. महापालिकेकडे सद्यस्थितीत व्हॉल्व्हमनची संख्याही अपुरी आहे. अशा स्थितीत दोनवेळ पाणीपुरवठा अशक्य असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेनेने दोनवेळ पाणीपुरवठ्याची मागणी केली असताना पक्षाचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी मात्र सिडको भागात दोनवेळ पाणीपुरवठा तांत्रिकदृष्ट्या होऊच शकत नसल्याचे स्पष्ट मत सिडको प्रभाग समिती सभेत व्यक्त केले आहे. त्यामुळे दोनवेळ पाणीपुरवठ्याच्या मागणीवरून सेनेतच मतप्रवाह असल्याचे दिसून आले आहे.