शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे गणित का फिस्कटले?

By admin | Updated: March 22, 2017 01:58 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या इतिहासात दुसऱ्यांदा अध्यक्षपद खेचून आणण्यात शिवसेना यशस्वी ठरली, तर राष्ट्रवादीला २० वर्षांच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या इतिहासात दुसऱ्यांदा अध्यक्षपद खेचून आणण्यात शिवसेना यशस्वी ठरली, असे म्हणण्यापेक्षा भाजपाचा गाफील आत्मविश्वास आणि राष्ट्रवादीतील व्यक्तिगत राजकारण या दोन मुख्य कारणांनी केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाला पराभव पहावा लागला तर राष्ट्रवादीला २० वर्षांच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले.शिवसेना-कॉँग्रेस आणि माकप यांची युती होण्याआधीच शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेससमोेर युतीचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा होती. मात्र भाजपाकडून नगराध्यक्षपदाला सोडचिठ्ठी देत अध्यक्षपदाकडे डोळे लावून बसलेल्या धनश्री केदा अहेर यांच्या अध्यक्षपदासाठी भाजपाने राष्ट्रवादीपुढे आघाडीचा हात केला. राष्ट्रवादीने भाजपापेक्षा जास्त संख्याबळ असल्याने अध्यक्षपद आपल्याकडेच राहील, या हेतूने आघाडीबाबत बोलणी सुरू केली. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी आपल्याऐवजी भाजपाला सोबत घेत असल्याची कुणकुण लागल्यानेच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आमदार निर्मला गावित, आमदार जिवा गावित यांची भेट घेत त्यांच्यासमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला. कॉँग्रेसने वेळ न दवडता प्रस्ताव स्वीकारला तर माकपने सेनेला चर्चेत झुलवत ठेवत अखेरच्या सहा दिवसांत सोबत देण्याचा निर्णय दिला. इकडे भाजपा व राष्ट्रवादी माकप शिवसेनेसोबत जाणारच नाही, या आविर्भात होती. शेवटच्या तीन दिवसांत भाजपा-राष्ट्रवादी आघाडीने फासे फेकण्यास सुरुवात केली. पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार राहुल अहेर यांनी राष्ट्रवादी व माकपसोबत चर्चा सुरू केली. मात्र तोेवर सेना-कॉँग्रेसची आघाडी होऊन सदस्य सहलीलाही रवाना झाले होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या तासभर आधीपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार मंदाकिनी बनकर यांचे पती माजी आमदार दिलीप बनकर माकप आपल्यासोबत येईल, नाही तर तटस्थ राहत आपला विजय सुकर करतील, या फाजील आत्मविश्वासात होते. माकपने गटनेते रमेश बरफ यांच्या रूपाने केवळ तटस्थता पाळत अन्य दोन सदस्यांनी चक्क सेना व कॉँग्रेसच्या उमेदवारांना मतदान केले. येथेच राष्ट्रवादी व भाजपाच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले. (प्रतिनिधी)