शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या मुलाखती सुरू

By admin | Updated: August 7, 2014 02:02 IST

विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या मुलाखती सुरू

 

नाशिक : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांतील उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक बापूसाहेब भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार होते. यावेळी माजी मंत्री तुकाराम दिघोळे, प्रदेश पदाधिकारी नाना महाले, माणिकराव शिंदे, दिलीप खैरे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, प्रकाश नन्नावरे, श्रीराम शेटे, डॉ. भारती पवार, कोंडाजीमामा आव्हाड, महिला जिल्हाध्यक्ष शोभा मगर, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, शहराध्यक्ष छबू नागरे, दीपक वाघ, प्रेरणा बलकवडे आदि उपस्थित होते. उद्या गुरुवारीही चार मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे.यावेळी भुजबळ पुढे म्हणाले की, माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय घेतले ते निर्णय आता केंद्रातील सत्ताधारी पक्ष घेताना दिसत नाही. कोणतेही ठोस निर्णय न घेता महागाई कमी करण्याच्या दृष्टीने मोदी सरकार अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघनिहाय घेण्यात आलेल्या बैठकीत देवळाली मतदारसंघ, मालेगाव बाह्य, सिन्नर, बागलाण, नाशिक पश्चिम या मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. यावेळी मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांनी आपली बाजू मांडली. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील लेखाजोगा मांडत विविध सूचनाही मांडल्या. विधानसभा मतदारसंघ निहाय इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्यावेळी प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले, जनकल्याण बॅँकेचे अध्यक्ष नानासाहेब सोनवणे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष कविता कर्डक, नगरसेवक शिवाजी चुंबळे, हरिष भडांगे, रामदास सदाफुले, भगवान दोंदे, दीपक वाघ, सुनील कोथमिरे, रविकिरण घोलप, रतन काळे, राजेंद्र भोसले, संदीप लोंढे, बंडूनाना भाबड, बाळासाहेब सोनवणे, छबू नागरे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)