शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा मोर्चा : दुचाकी ढकलून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 20:13 IST

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि.१६) दुचाकी ढकलत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले

ठळक मुद्देसरकारने केलेल्या दरवाढीचा निषेध करण्यात आलाशात पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांक गाठत आहेतराज्यात दुष्काळ जाहीर न करता, पेट्रोल-डिझेलवर दुष्काळ कर कशासाठी

नाशिक : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि.१६) दुचाकी ढकलत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. वाढते पेट्रोल व डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असल्याचे सांगत राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर या दरवाढीचा निषेध मोर्चा काढलाराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. ‘मोदी तेरा अच्छा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. बंद दुचाकी वाहने ढकलत आणत ती परवडत नसल्याचे दाखवत, सरकारने केलेल्या दरवाढीचा निषेध करण्यात आला. राष्टÑवादीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये क्रुड आॅइलचे दर घसरले असतानाही देशात पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांक गाठत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने नक्की कोणाला सुखाचे दिवस येणार आहेत हे सरकारने जनतेला सांगावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बलकवडे यांनी यावेळी केले. राज्यात दुष्काळ जाहीर न करता, पेट्रोल-डिझेलवर दुष्काळ कर कशासाठी घेतला जातोय आणि ज्या शेतकºयांच्या नावाखाली ही लूट सरकारने चालवली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. केंद्राने ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी करत आंदोलनाचा इशाराही दिला.