शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

नवरंगी कारंजाचे शंभरफुटी उड्डाण

By admin | Updated: December 28, 2016 01:07 IST

राज्यातील एकमेव उंच कारंजा असल्याचा राज ठाकरे यांचा दावा

नाशिक : लाल, हिरवा, पिवळा, जांभळा, नारंगी अशा नवरंगाने प्रकाशमान झालेल्या घारपुरे घाट पुलाजवळ गोदापात्रात रोषणाईने उजळलेला महापालिकेच्या कारंजाचे शंभर फुटांपर्यंत उडणाऱ्या तुषारांनी मंगळवारी (दि.२७) संध्याकाळी नाशिककरांचे डोळ्यांचे पारणे फेडले.महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी सुशोभिकरणाची कामे करण्यात आली असून, या कामांची पाहणी व लोकार्पण मंगळवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व अभिनेता नाना पाटेकर, भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, दिग्दर्शक के दार शिंदे आदिंच्या उपस्थितीत करण्यात आले. संध्याकाळी राज ठाकरे व अभिनेत्यांचे घारपुरे घाट पुलावर आगमन झाले. सिनेसृष्टीतील मंडळींना बघण्यासाठी नाशिककरांची यावेळी एकच गर्दी लोटल्याने पोलिसांची धावपळ उडाली. नाना पाटेकर, भरत जाधव वाहनामधून खाली उतरताच चाहत्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गराडा घालण्याचा प्रयत्न के ला. यामुळे सुरक्षारक्षक व पोलिसांनी तातडीने कडे करून सर्व पाहुण्यांना पुलावरील संरक्षक जाळीपर्यंत आणले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते कारंजाचे लोकार्पण करण्यात आले. नाना पाटेकर यांच्या हस्ते कळ दाबून कारंजा सुरू करण्यात आला आणि हळूहळू थेट शंभर फुटापर्यंत कारंजा वाढत गेला. रंगीबेरंगी रोषणाईने उजळलेला गोदापात्रातील कारंजा बघून नाशिककर सुखावले. नाशिकमध्ये हा एकमेव असा कारंजा असून, हा कारंजा बघण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पुलावर बाळगोपाळांना घेऊन नागरिकांनी गर्दी केली होती. नदीपात्रात रोषणाईसह उभारण्यात आलेला गोदावरीमधील कारंजा हा नाशिकमधील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच कारंजा असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.होळकर पुलावर ‘पाण्याचा पडदा’ महापालिकेच्या वतीने गोदावरीवरील ब्रिटिशकालीन अहल्याबाई होळकर पुलावर येत्या आठवडाभरात नाशिककरांना लेझर लाइटद्वारे आकर्षक पद्धतीचा ‘पाण्याचा पडदा’ नजरेस पडणार असल्याचा ‘शब्द’ नाशिककरांना दिला. होळकर पुलाचे सौंदर्य यामुळे खुलणार असल्याचे ठाकरे म्हणाले.