शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मानोरी परिसरात पावसाने पिकांना नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 19:25 IST

मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागात खरीप हंगामातील पिकांची लागवड झाल्यानंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर मका, सोयाबीनचे पीक कडक उन्हाने काहीसे कोमजण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे मागील पाच ते सहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढल्याने दमट वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्दे शेतात कामकरणारे शेतकरी आणि महिला वर्गांची मोठी धावपळ उडाली होती.

मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागात खरीप हंगामातील पिकांची लागवड झाल्यानंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर मका, सोयाबीनचे पीक कडक उन्हाने काहीसे कोमजण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे मागील पाच ते सहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढल्याने दमट वातावरण निर्माण झाले होते.शनिवारी (दि.२०) दुपारी मध्यम पावसाने कमबॅक केल्याने मका, सोयाबीनच्या पिकांना या पावसाने नवसंजीवनी मिळणार आहे. सकाळ पासूनच उन्हाची तीव्रता नेहमी पेक्षा जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात दमट वातावरण होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केल्याने विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. यावेळी शेतात कामकरणारे शेतकरी आणि महिला वर्गांची मोठी धावपळ उडाली होती.मका, सोयाबीन निंदणीची सुरू असलेली कामे पावसामुळे अर्ध्यावर सोडून शेतकरी घरी परतले होते. यंदा येवला तालुक्यातील पश्चिम भागात समाधान कारक हा वेळेत पाऊस पडत असल्याने निंदणी, खुरपणी देखील मोठ्या हौशेने सुरू असून अमेरिकन लष्करी अळीमुळे मात्र शेतकभयभित झाले आहेत.गत वर्षी दुष्काळाशी सामना करून यंदा लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांची अवस्था जणू आगीतून सुटून फोफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. मानोरी, पिंपळगाव लेप, खडकीमाळ, देशमाने, मुखेड फाटा, जळगाव नेऊर आदी परिसरात शेतकरी लष्करी अळीचा नायनाट करण्यासाठी मक्याला महागडी औषधे फवारणी करत आहेत. आत्तापर्यंत दोनदा औषध फवारणी केली असून काही ठिकाणी अळी जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा दमदार पाऊस पडूनही मका हातातून जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.