शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात नवरात्रोत्सवाला रंगत; दांडियाची धूम

By admin | Updated: October 16, 2015 22:35 IST

शहरात नवरात्रोत्सवाला रंगत; दांडियाची धूम

नाशिक : नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेपर्यंत नवरात्रोत्सवाला रंगत चढली असून, शहरातील अनेक ठिकाणी गरबा दांडिया खेळला जात आहे. शहरातील देवी मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असून, कालिका माता यात्रोत्सवाला भाविक हजेरी लावत आहेत. यंदा नवरात्रोत्सवावर दुष्काळाचे सावट असले तरी चौथ्या माळेनंतर नवरात्रोत्सवात रंगत येत असल्याचे चित्र आहे. अनेक परंपरागत दांडिया उत्सवांना आता सुरुवात झाली आहे. अनेक मंगल कार्यालय आणि लॉन्समध्ये दांडियाचा ठेका धरला जात आहे. शहरातील गुजराथी बांधवांकडून पारंपरिक गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकरोड आणि नाशिक शहरात गुजराथी बांधव एकत्र येऊन गरबा उत्सव साजरा करत आहेत.त्याचप्रमाणे बंगाली बांधवांच्या दुर्गा उत्सवालादेखील येत्या दोन-तीन दिवसांत सुरुवात होणार असून, गांधीनगर आणि सिडको येथील बंगाली बांधव उत्सवाच्या तयारी लागले आहेत. ग्रामदेवता कालिका मातेचा यात्रोत्सव यंदा मोठ्या प्रमाणात भरला आहे. त्र्यंबक सिग्नल ते महामार्ग बसथांब्यापर्यंत दुकाने थाटली असून, सायंकाळी या मार्गावरील वाहतूक वळवावी लागली आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची दिवसभर रीघ सुरू आहे. विशेषत: सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीसाठी परिसरातील महिला भाविक आवर्जुन हजेरी लावत आहेत.नाशिकरोड येथील दुर्गादेवी आणि भगूर येथील रेणुकामाता येथेदेखील मोठ्या प्रमाणात यात्रा भरली आहे. भगूरला देवी दर्शनासाठी विशेष बसचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून नाशिकरोड येथील दुर्गादेवी यात्रोत्सवात वाढ झाली आहे. यंदा यात्रेत मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली आहेत. शहरातील उपनगरांमध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांचा गरबा रंगला आहे.