शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नवकलाकारांसाठी साधनेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:45 IST

गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आदी कोणतीही कला असो, ती सरावाने बहरते व उत्तरोत्तर विकसित होत असते, त्यामुळे कलाक्षेत्रात येणाºया प्रत्येकाने कलेची आयुष्यभर साधना करण्याची गरज असल्याचा सूर चित्रप्रवास व प्रात्यक्षिक परिसंवादात उमटला.

नाशिक : गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आदी कोणतीही कला असो, ती सरावाने बहरते व उत्तरोत्तर विकसित होत असते, त्यामुळे कलाक्षेत्रात येणाºया प्रत्येकाने कलेची आयुष्यभर साधना करण्याची गरज असल्याचा सूर चित्रप्रवास व प्रात्यक्षिक परिसंवादात उमटला. के. के. वाघ ललित कला महाविद्यालयातर्फे कुसुमाग्रज स्मारक येथे कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती व्याख्यानमालेचे ३२वे पुष्प गुंफताना चित्रकार राजेश सावंत व प्रफुल्ल सावंत या सावंत बंधूंनी चित्रकलेचे विविध पैलू उलगडून सांगितले. ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या परिसंवादात सावंत बंधूंनी त्यांच्या चित्रकलेचा प्रवास उलगडताना शालेय जीवनातील चित्रकलेचा प्रवास तसेच शाळाबाह्य स्पर्धांमधून घेतलेल्या सहभागाच्या आठवणींना उजाळा दिला. तत्कालीन परिस्थितीत विविध स्पर्धांमधून सहभाग घेताना ज्येष्ठ चित्रकार व घरातील चित्रकलेला असलेले पोषक वातावरण सदैव प्रोत्साहन देणारे ठरल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा. बाळ नगरकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. माधुरी गायधनी यांनी केले.चित्रशिल्प प्रदर्शनकर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या स्मृतीत व्याख्यानमालेदरम्यान, कुसुमाग्रज स्मारक येथे चित्रशिल्प प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार व सावंत बंधूंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात विविध चित्रकृती व शिल्पकृती मांडण्यात आल्या असून, हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.