शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

मालेगावच्या बसस्थानकाला यात्रेचे स्वरूप

By admin | Updated: September 24, 2016 22:46 IST

मालेगावच्या बसस्थानकाला यात्रेचे स्वरूप

मालेगाव : शहरासह तालुक्यातून हजारो मराठा समाजबांधव नाशिक येथील मराठा क्रांती मोर्चासाठी सकाळी रवाना झाले.तालुक्यातील समाजबांधव खासगी वाहनांनी मालेगावी दाखल झाले, तर शहरातील आबालवृद्ध सकाळपासूनच मिळेल त्या वाहनाने मनमाड चौफुलीपर्यंत गेले. तेथून विविध कार्यकर्त्यांनी नाशिकला जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. यात लहान मुलांसह महिलांचाही संख्या लक्षणीय होती. मराठा समाजबांधवांखेरीज इतर समाजाचे कार्यकर्तेदेखील आपला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी नाशिकला रवाना झाले. नवीन बसस्थानकातून दर तासाला नाशिकला बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे बसस्थानकाला जत्रेचे स्वरूप आले होते. नाशिकच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीने सर्व बसेस तुडुंब भरून नाशिककडे मार्गस्थ होत होत्या. नेहमीच वर्दळीत असणाऱ्या कॅम्पात आज शुकशुकाट जाणवला. तसेच शहरातील काही दुकाने बंद असल्याने शुकशुकाट जाणवत होता. दिवसभर व्हॉट्सअ‍ॅपवर उपस्थित मोर्चेकऱ्यांच्या संख्याविषयी चर्चा सुरू होती. शाळा- महाविद्यालयांना शनिवारी सुटी देण्यात आली होती. त्यामुळे शहरासह तालुक्यांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. मूक मोर्चात सामील होण्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे काही व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद ठेवला. यात शेतकरी, शेतमजुरांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. दिवसभर नाशिक येथील मराठा क्रांती मोर्चाची चर्चा सुरू होती. सकाळपासून नागरिकांकडून मोर्चाच्या आकड्याविषयी तर्कवितर्क सुरू होते. ४० लाखांपासून ७५ लाखांपर्यंतचा अंदाज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होता. विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी मोर्चेकऱ्यांसाठी वाहन व्यवस्था करून दिली होती, तर इतर सर्व समाजातील नागरिक मिळेल त्या वाहनाने मराठा समाजबांधवांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)दाभाडी : मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थनार्थ दाभाडीत कडकडीत बंद पाळण्यात आला. संपूर्ण गावात कोणताही भेदभाव न मानता एकमुखी पाठिंबा देत दुकाने बंद ठेवण्यात आली. कोपर्डी घटनेचा निषेध नोंदवत एक दिलाने बंद पाळण्यात आला. गावातून एकूण १२० मोठ्या वाहनांतून व लहान-मोठ्या किमान दोनशेच्या आसपास वाहनांतून समाजबांधव नाशिकला रवाना झाले. कोणत्याही दबावविना स्वयंस्फूर्तीने दाभाडीकरांनी बंद पाळून मराठा क्रांती मोर्चास पाठिंबा दिला.