शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाने झोडले, प्रशासनाने नाडले!

By admin | Updated: June 28, 2014 01:50 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यावर निसर्गाची जशी अवकृपा आहे तशीच प्रशासनाचीही खप्पामर्जी आहे आणि त्यामुळेच येथील जनतेला सातत्याने टाहो फोडूनही तहान भागविण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.

बाळासाहेब सोमासे ल्ल जळगाव नेऊरयेवला तालुक्यावर निसर्गाची जशी अवकृपा आहे तशीच प्रशासनाचीही खप्पामर्जी आहे आणि त्यामुळेच येथील जनतेला सातत्याने टाहो फोडूनही तहान भागविण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील डोंगरगाव, सावरगाव व खिर्डीसाठे या गावांना प्रशासकीय पातळीवरील उदासीनतेचा असाच सामना करावा लागत असून, त्यामुळे येथील धरण तसेच तलावांचा डागडुजी करण्यासाठीचा ५७ लाखांचा खर्च अक्षरश: पाण्यात गेला आहे तर उत्तर-पूर्व भागास मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील डोंगरगाव लघु तलावात येण्याची दशकानुदशके वाट पाहत आहे. डोंगरगावी धरणाला पाझरडोंगरगाव येथील धरणात दगडाच्या पिचिंग लेव्हलपर्यंत पाणी येताच खालच्या बाजूस पाण्याची गळती होते. त्यामुळे धरण रिकामे होते. या पाण्याची गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेली नाही. गतवर्षी मेरीच्या अभियंत्यांच्या पथकाने गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पाहणी केली. मात्र कार्यवाही झालेली नाही. मांजरपाडा प्रकल्पाचे पाहणी या धरणात येण्यापूर्वी तरी गळती थांबविली जावी, अशी मागणी आहे.सद्यस्थितीत सदर धरण सुमारे ५० टक्के गाळाने भरले आहे. त्यामुळे साठवण क्षमता घटली आहे. शासकीय पातळीवर धरणातील गाळ काढण्याची कृती होत नाही. शेतकरी स्वखर्चाने शेतात टाकण्यासाठी गाळ काढतात तेवढ्यावर धरणास जीवदान मिळते. सांडव्याची दगडी भिंत जागोजागी फुटली असून, तिची दुरुस्ती केली जात नाही. धरणासाठी रखवालदार नियुक्त नाही. चौकीदार निवासाच्या केवळ भिंती शिल्लक असून, त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. या धरणात व नदीपात्रात अनेक खासगी विहिरी असून, या कागदोपत्री खासगी क्षेत्रावर दर्शविलेल्या असल्या तरी त्या धरणक्षेत्रात व नदीपात्रात आहेत. या विहिरींद्वारे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा बेकायदा उपसा होतो. त्यामुळे धरणातील पाणी आटते. शिवाय पाणीपट्टीची आकारणी होत नसल्याने पाटबंधारे खात्याचे उत्पन्नही बुडते.सावरगावचीही तीच तऱ्हासावरगाव येथे १९८५ मध्ये धरण बांधण्यात आले. या धरणातही मोठ्या प्रमाणात गाळ साठला होत्या. मागील वर्षी माजी सभापती संभाजी पवार यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी व लोकसहभागातून गाळ काढला. त्यामुळे साठवणक्षमता वाढली असली तरी खोली वाढविणे, साठवण क्षमता वाढविणे, झुडपे तोडणे यासारखे उपाय गरजेचे आहे. पावसामुळे धरणावरील मातीचे वहन होऊ नये म्हणून धरणावर मुरमाचा थर दिल्यास धरणाचे आयुष्य वाढण्यास मदत होईल.खिर्डीसाठेचा तलाव कोरडापालखेड पाटबंधारे खात्याच्या पूर्व विभागाच्या नियंत्रणाखालील खिर्डीसाठे येथे असलेल्या तलावाचा लाभ खिर्डीसाठे, नगरसूल, मातुलठाण, वडगाव, नागडे या गावांना होतो. गतसाली लोकसहभागातून धरणातील गाळ काढण्यात आला. या धरणाची डागडूग, दुरुस्ती, गाळ काढणे, खोली वाढविणे, धरणाची उंची वाढविणे हे उपाय धरणाची साठवण क्षमता वाढवू शकते.