शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठाला कचराकुंडीचे स्वरूप

By admin | Updated: October 20, 2015 21:04 IST

शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात : मनपा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याला महिन्याभराचा कालावधी उलटत नाही तोच गोदाकाठ परिसरात दिवसेंदिवस कचरा पडून राहण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने सध्या येथील परिसराला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गोदाकाठचा परिसर धार्मिक स्थळ असल्याने या भागात मनपाच्या आरोग्य विभागाने कायम स्वच्छता ठेवणे गरजेचे असताना पंचवटी आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या सण-उत्सवाचे दिवस असल्याने शेकडो भाविक गंगाघाट परिसरात रामकुंडावर, तसेच सांडव्यावरची देवी मंदिरात दर्शनासाठी येत असतात. गंगाघाट परिसरातील भाजीबाजारासमोरील साईबाबा मंदिरासमोरच मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे. याशिवाय रामसेतू पुलाजवळ असलेल्या नदीपात्रालगत मोठा कचरा साचलेला असला तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत प्रशासनाने भाजीबाजार हटविला असला तरी मोठ्या प्रमाणात केरकचरा साचत असल्याने परिसरातील नागरिक बिनधास्तपणे कचरा टाकत असल्याने आरोग्य विभागाकडून त्यांच्यावरही कारवाई केली जात नाही. मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत कचऱ्याचा ढिगारा साचून असला तरी घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून तो उचलला तर गेला नाहीच, शिवाय पंचवटी मनपाच्या आरोग्य विभागाचेदेखील लक्ष वेधले गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)

कलशच कचराकुंडीत

मनपा प्रशासनाने गंगाघाट परिसरात अनेक ठिकाणी कचरा संकलनाचे कलश ठेवलेले होते. मात्र प्रशासनाने हेच कलश थेट कचराकुंडीत ठेवल्याने ते कचराकुंडी असल्याचे चित्र सध्या गंगाघाटावर दिसून येते. प्रशासनाने कचरा संकलनासाठी ठेवलेले कलश प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कचराकुंडीत पडून असल्याने आरोग्य विभाग सुस्त असल्याचे बोलले जात आहे.