शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

येवल्यात राष्टÑवादीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 22:52 IST

येवला : वाढती महागाई, पाणीटंचाई, शासनाची शेतकऱ्यांकडून सुरू असलेली सक्तीची वीजबिल व कर्जवसुली, पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न, पालखेड कालव्याचे आवर्तनाबाबत अनिश्चितता, येवला तालुका दुष्काळी जाहीर करणे, मांजरपाड्याचे रखडलेले काम लवकर पूर्ण करणे या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देतहसील कार्यालय : दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

येवला : वाढती महागाई, पाणीटंचाई, शासनाची शेतकऱ्यांकडून सुरू असलेली सक्तीची वीजबिल व कर्जवसुली, पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न, पालखेड कालव्याचे आवर्तनाबाबत अनिश्चितता, येवला तालुका दुष्काळी जाहीर करणे, मांजरपाड्याचे रखडलेले काम लवकर पूर्ण करणे या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पवार, राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यात येवल्याचा समावेश नाही त्यामुळे तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करण्याची मागणी वक्त्यांनी केली.यावेळी अंबादास बनकर, अरुण थोरात, वसंतराव पवार, यशवंत शिरसाठ, अकबर शाह, विजय पवार, ज्ञानेश्वर शेवाळे, साहेबराव मढवई, उषाताई शिंदे, संजय बनकर, हरिभाऊ जगताप, रामदास काळे, महेंद्र काले, किसनराव धनगे, प्रकाश वाघ, मोहन शेलार, अशोक मेंगाणे, दीपक लोणारी, अविनाश कुक्कर, हुसेन शेख, भाऊसाहेब बोचरे, विष्णू कºहेकर, रियाज मुलानी, साहेबराव आहेर, अनिल दारुंटे, शामा श्रीश्रीमाळ, निर्मला थोरात, अलका जेजुरकर, समिना शेख, विमलबाई शाह, तुळशीराम कोकाटे उपस्थित होते.सक्तीची कर्ज, वीजबिल वसुली थांबवायेवला तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येवलाविधानसभा मतदारसंघात अतिशय कमी पर्जन्यमान झाल्याने पाण्याअभावी तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. अशा परिस्थितीत शासनाने जाचक अटी लावून येवला तालुका दुष्काळी यादीतून वगळण्यात आला आहे. पालखेड धरणातून सिंचनाचे दोन आवर्तन शक्य असतानादेखील प्रशासन पाणी देण्यास टाळाटाळ करत आहे. तसेच अशा भयानक परिस्थितीतदेखील विद्युत महावितरण कंपनी सक्तीने वीजबिल वसुली करत आहे. बॅँकादेखील सक्तीची कर्ज वसुली करीत असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे.